Monday, June 24, 2024

धक्कादायक! ‘द वॉकिंग डेड’ फेम अभिनेता जॅनसेन पॅनेटिएरने वयाच्या अवघ्या 28 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

‘द वॉकिंग डेड’ आणि ‘आइस एज: द मेल्टडाउन’ स्टार अभिनेता जॅन्सेन पॅनेटिएर याचे रविवारी न्यूयॉर्क शहरात निधन झाले. ताे 28 वर्षांचे होता. अभिनेत्याचा भाऊ हेडन पॅनेटिएरच्या प्रतिनिधीने, त्याच्या मृत्यूची पुष्टी केली. ‘द वॉकिंग डेड’ मधील त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी अभिनेता प्रसिद्ध आहे. या अभिनेत्याच्या निधनामुळे सिनेजगतात शोककळा पसरली आहे. सर्व स्टार्स त्याच्या मृत्यूवर शोक व्यक्त करत आहेत.

पॅनेटीयरचा जन्म 25 सप्टेंबर 1994 रोजी न्यूयॉर्कमध्ये झाला. अभिनेत्याच्या कुटुंबात त्याची बहीण आणि आई-वडील आहेत. ‘द वॉकिंग डेड’ व्यतिरिक्त, अभिनेता ‘इव्हन स्टीव्हन्स’, ‘द एक्स’, ‘द फोर्जर’, ‘द मार्शल आर्ट्स चाइल्ड’, ‘समर फॉरएव्हर’ आणि ‘लव्ह अँड लव्ह नॉट’ मध्ये दिसला होता. त्याने त्याच्या बहिणीसोबत 2004 मध्ये आलेल्या ‘टायगर क्रूझ’ चित्रपटातही काम केले. अभिनेत्याने कारकिर्दीच्या सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये ‘मिडोरीज निन्टेंडोलँड बेकरी’, ‘ग्रँड सेंट्रल बेनेट’ आणि ‘ब्लूज क्लूज’ यांचा समावेश आहे. (hollywood actor jansen panettiere passed away at the age of 28)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
नोरा फतेही डेटला कधीच भरत नाही बिल; पाहा अर्चनाच्या प्रश्नावर काय म्हणाली अभिनेत्री

राज कपूरसाेबतच्या अफेअरवर झीनत अमानने ताेडले माैन; म्हणाल्या, ‘देव आनंदला असं वाटलं…’

हे देखील वाचा