बॉलिवूडमधील काही कलाकारांची लोकप्रियता संपूर्ण जगात पसरली आहे. अनेकांनी बॉलिवूडपासून ते हॉलिवूडपर्यंत अभिनय करून प्रेक्षकांना हैराण केले. परंतु जेव्हा गोष्ट जगातील सर्वात आकर्षक पुरुषाची येते, तेव्हा यात अमेरिकन अभिनेता पॉल रड याचा समावेश होतो. पॉल रड याची लोकप्रियता संपूर्ण दुनियेत पसरली आहे. अमेरिकेच्या बाहेर देखील त्याच्या चाहत्यांची संख्या लाखांमध्ये आहे. त्याने अनेक हॉलिवूड मालिकांमध्ये काम केले आहे.
एका प्रतिष्ठित मॅगझिनने ५२ वर्षीय पॉल रड याला जगातील सगळ्यात सेक्सी पुरुषाचा किताब दिला आहे. या प्रसिद्ध मॅगझिनने पॉलला २०२१ मधील ‘सेक्सिएस्ट मॅन अलाईव्ह’ पुरस्काराने सन्मानित केले आहे. याबाबत त्याने बॉलिवूड आणि हॉलिवूडमधील अनेक कलाकारांना मागे टाकले आहे. कोणत्याही कलाकाराला हा पुरस्कार मिळणे सन्मानाची गोष्ट आहे. पॉलने मॅगझिनला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, “मला दयाळू, मेहनती यांसारखे अनेक पुरस्कार मिळाले आहेत परंतु सेक्सी? ही थोडीशी वेगळी गोष्ट आहे.” (Hollywood actor Paul Rudd named sexiest man alive 2021 by famous magazine his wife gave epic reaction)
पॉल रड हा दोन मुलांचा बाप आहे. कॉमेडियन अभिनेत्याला सगळ्यात सेक्सी पुरुषाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर त्याने ही गोष्ट सगळ्यात आधी त्याच्या पत्नीला सांगितले. त्याच्या पत्नीने जेव्हा ही गोष्ट ऐकली तेव्हा त्याची पत्नी हैराण झाली होती. पॉलने हे देखील सांगितले की, त्याला या गोष्टीची पूर्ण जाणीव आहे की, लोकं यावर काय प्रतिक्रिया देतील.
पॉल रड याच्या करिअरबाबत बोलायचे झाल्यास, त्याला मर्वाल यांच्या ‘एंट मॅन’ चित्रपटातील भूमिकांसाठी ओळखले जाते. यासोबतच त्याने ‘दिस इज ४०’, ‘क्लिलेस’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच लवकरच तो टीव्ही प्लसची सीरिज ‘द श्रिंक नेक्स्ट डोर’ मध्ये दिसणार आहे. या सीरिजचे पहिले प्रसारण १२ नोव्हेंबरला होणार आहे. अमेरिकन निर्माते मायकल शोवॉल्टर यांनी या सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. यासोबत त्याने ‘फ्रेंड्स’ या सीरिजमध्ये देखील काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–मालिकेतून मिळालेल्या प्रसिद्धीपेक्षा अफेयरमुळे जास्त चर्चेत आली अभिनेत्री दिशा परमार
–श्रीदेवी यांच्या आईला इंप्रेस करण्यासाठी बोनी कपूर यांनी मान्य केले होते ‘एवढे’ लाख रुपये
–कधीही दारू न पिणाऱ्या जॉनी वॉकर यांनी व्हिस्कीच्या ब्रँडवरून ठेवले होते स्वतःचे नाव