मनोरंजन क्षेत्रातील सगळ्यात मोठ्या दोन कंपन्यांचा करार पक्का झाला आहे. ऍमेझॉनने हॉलिवूडमधील चित्रपट निर्मिती करणारी सर्वात नामांकित कंपनी एमजीएमला विकत घेतले आहे. 8.45 अरब डॉलरमध्ये (६० हजार कोटी) हा करार झाल्याचे वृत्त आहे. तब्बल 97 वर्षांपूर्वी म्हणजेच 17 एप्रिल, 1924 साली एमजीएम या स्टुडिओची स्थापना मार्कस लोए आणि लुईस बी मेयर यांनी केली होती. ही कंपनी गेल्या चार वर्षांपासून जेम्स बाँड याच्या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. त्यांनी केलेल्या या कराराबद्दल सोशल मीडियावर खूप चर्चा चालू आहे. काही लोक या बाबत खूप भावनिक होत आहेत, तर काहीजण याची खिल्ली उडवत ट्रोल करत आहेत.
एमजीएम खरेदी केल्यानंतर ऍमेझॉन जास्त चित्रपट, शो आणि अनेक पात्रांना एक्सेस देणार आहे. यामध्ये रॉकी, रोबोकॉप आणि पिंक पँथर सामील असणार आहेत. ऍमेझॉनला एक केबल चॅनल एपिक्स देखील मिळणार आहे. ज्याचे मालक एमजीएम असणार आहेत. एमजीएम हे हॉलिवूडमधील सर्वात जुने स्टुडिओ आहे.
“The name’s Bezos. James Bezos… “ (With apologies to Ian Fleming and @JeffBezos ) https://t.co/7BgwH8DKPZ
— anand mahindra (@anandmahindra) May 26, 2021
ऍमेझॉनने हे नाही सांगितले की, त्यांच्या प्राईम व्हिडिओ सर्व्हिसला किती लोक पाहू शकतात. पण 200 मिलियनपेक्षाही जास्त लोकांकडे त्याचा ऍक्सेस आहे. कारण त्यांनी त्यांची मेंबरशिप साईनअप केली आहे. ज्यामुळे त्यांना खूप फायदा होणार आहे. ऍमेझॉन व्हिडिओसोबत ऍमेझॉनकडे एक मोफत स्ट्रिमिंग सुविधा आहे. प्राईम व्हिडिओ आणि ऍमेझॉन स्टुडिओचे वरिष्ठ उपाध्यक्ष माईक होपकिन्सने सांगितले की, एमजीएमने 17, 000 टीव्ही शो निर्माण केले आहे. या मध्ये ‘फर्गा’, ‘द हॅंड मेड्सटेल आणि वाइकिंग्स यांचा समावेश होतो.
मेट्रो गोल्डविन मायर ज्यांना सगळेजण एमजीएम या नावाने ओळखतात. हे हॉलिवूडमधील सर्वात मोठ्या स्टुडिओ पैकी एक आहे. ज्यामध्ये आतापर्यंत 4,000 पेक्षाही जास्त लोकप्रिय चित्रपट बनले आहे. यामध्ये ‘बेसिक इंस्टिंक्ट’ ‘क्रिड’,’जेम्स बाँड’, ‘मूनस्ट्रक’, ‘रेजिंग बूल’, ‘सायलेन्स ऑफ द लॅब्स’, ‘द पिंक पँथर’, ‘टुम्ब रेडर’, यासारख्या चित्रपटांचा समावेश होतो. हे स्टुडिओ 180 ऑस्कर आणि 100 पेक्षाही जास्त ऐमी पुरस्कार जिंकले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…










