Saturday, July 27, 2024

अतिशय खराब काळात तुषार कपूरला लोकं द्यायचे ‘हा’ घाणेरडा सल्ला, शेवटी त्यानेच…

दिग्गज अभिनेते जितेंद्र यांचा मुलगा अभिनेता तुषार कपूरला हिंदी सिनेसृष्टीत अपेक्षीत यश आजपर्यंत मिळाले नाही. नोव्हेंबर महिन्यात आपला 47वा वाढदिवस साजरा करणाऱ्या तुषारने  2001पासून केवळ 39 सिनेमात काम केले असून त्यातही अनेकवेळा तो मल्टिस्टारर सिनेमांत किंवा साईड हिरो म्हणून दिसला. वडिल सुपरस्टार अभिनेते, आईच्या नावाचे मोठे प्रोडक्शन हाऊस तर केवळ एक वर्षाने मोठी असलेली बहीण एकता कपूर टेलीव्हीजन व चित्रपट क्षेत्रातील मोठी निर्माती व दिग्दर्शक, तरीही तुषारची गाडी कधी रुळावर आलीच नाही. तुषारने अलीकडेच चित्रपटसृष्टीतल्या त्याच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल अनेक रहस्ये उघडकीस आणली आहेत. नवोदित म्हणून त्याला काही असामान्य सल्ले देण्यात आल्याचेही त्याने उघड केले. तुषारने करीना कपूरसोबत 2001 साली ‘मुझे कुछ कहना है’ या चित्रपटाद्वारे त्याच्या कारकिर्दीची सुरूवात केली होती.

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने खुलासा केला की, त्याला पार्टीमध्ये भांडण करण्याचा आणि शाहरुख खानसारखा अभिनय करण्याचा सल्ला देण्यात आला होता. खरं तर त्याला हे सल्ले विनोदी वाटले होते.

संभाषणादरम्यान त्याने सांगितले की, “माझ्या कारकिर्दीच्या सुरुवातीला मी थोडा शांत प्रकारचा होतो. तेव्हा लोक मला विचित्र सल्ले द्यायचे. जसे की, पार्ट्यांमध्ये जाऊन भांडण कर, चित्रपटाच्या एखाद्या सीनमध्ये शाहरुख खानप्रमाणे एक्सप्रेशन्स दे. खरोखर माझ्यासाठी ही मजेदार बाब होती. ते भीतीदायक देखील होते, कारण मी एका फिल्मी फॅमिलीमधून आलो होतो आणि अशामध्ये मला हे सर्व सांगण्यात येत होते.”

तो पुढे म्हणाला की, “वेळ बदलली आहे, पण त्या दिवसात काही लोक मला विनामूल्य सल्ला देत असायचे. तुम्ही अशा लोकांना प्रोडक्शन हाऊस आणि सेटवर सहजपणे पाहू शकता. तुम्ही जवळपास सर्व गोष्टींचा अंदाज लावायला सुरू कराल. हळूहळू मला समजले की, जर आपण आपले कार्य प्रामाणिकपणे करत असाल, तर या सर्व गोष्टींबद्दल अधिक विचार करण्याची गरज नाही.”

तुषार कपूरने बॉलिवूडमध्ये 20 वर्षे पूर्ण केली आहेत. 2001 मध्ये त्याचा ‘मुझे कुछ कहना है’ हा पहिला चित्रपट रिलीझ झाला होता. तुषारने या चित्रपटाचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्याचे दिग्दर्शन सतीश कौशिक यांनी केले होते. जवळपास 39 सिनेमांत काम केलेल्या तुषारचा ‘गोलमाल अगेन’ हा अभिनेता म्हणून काम केलेला शेवटचा सिनेमा होता. तर अक्षय कुमारची मुख्य भूमिका असलेला 2020साली आलेल्या ‘लक्ष्मी’ सिनेमाद्वारे त्याने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले आहे. तुषार अविवाहीत असून तो सरोगसीच्या माध्यमातून 2016 साली एका मुलाचा बाप झाला आहे. तुषारप्रमाणेच त्याची बहीण एकताही सिंगल पॅरेंट असून ती देखील सरोगसीच्या माध्यमातून 2019 साली Ravie नावाच्या मुलाची आई झाली आहे. (tusshar kapoor opened many secrets about the early days of his career)

हे देखील वाचा