Monday, June 17, 2024

अभिनेत्री ब्रिटनी स्पीयर्स तिसऱ्यांदा चढली बोहल्यावर, पूर्व पतीने ऐन लग्नात घातला गोंधळ | hollywood

हॉलिवूडची पॉप सिंगर ब्रिटनी स्पीयर्सने (britney spears)दोन अयशस्वी विवाहानंतर पुन्हा एकदा लग्नगाठ बांधली आहे. ब्रिटनी स्पीयरने तिचा बॉयफ्रेंड सॅम असगरीसोबत लग्न केले आहे, पण ब्रिटनीच्या लग्नाच्या काही तास अगोदर काही गोंधळ झाला, त्यानंतर पोलिसांना घटनास्थळी पाचारण करावे लागले.

ब्रिटनी स्पीयर्सने 9 जून रोजी बॉयफ्रेंड आणि मंगेतर सॅम असघारीशी लग्न केले. लग्न व्यवस्थित पार पडण्यापूर्वी ब्रिटनीचा माजी पती जेसन अलेक्झांडर विवाहस्थळी पोहोचला आणि जबरदस्तीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर त्यांनी गोंधळ घातला, त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि जेसनला घटनास्थळावरून ताब्यात घेतले.(Jason Alexander Arrested)

वृत्तानुसार, जेसन अलेक्झांडरला सुरक्षा रक्षकांनी थांबवले तेव्हा =त्यांच्यात हाणामारी झाली. तो रक्षकांना सांगत होता की ब्रिटनी माझी पहिली पत्नी आहे, तिने मला बोलावले आहे आणि मी तिच्या लग्नाला आलो आहे. गदारोळाची माहिती मिळताच पोलीस तेथे पोहोचले आणि जेसन अलेक्झांडरला अटक केली.

ब्रिटनी स्पीयर्स आणि सॅम असगरीची सप्टेंबर 2021 मध्ये एंगेजमेंट झाली, ज्याची माहिती तिने इंस्टाग्रामवर दिली. दोघे 6 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. जेसन आणि ब्रिटनी स्पीयर्सचे लग्न 2004 मध्ये झाले होते आणि हे लग्न केवळ 55 तास टिकले. जेसननंतर, ब्रिटनी स्पीयर्सने त्याच वर्षी केविन फेडरलाइनशी लग्न केले, परंतु 2007 मध्ये घटस्फोट घेतल्यानंतर दोघेही वेगळे झाले.

ब्रिटनी स्पीयर्सने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये चाहत्यांसोबत गरोदर असल्याची चांगली बातमी शेअर केली होती, मात्र मे महिन्यात तिने गरोदर असल्याचं दु:खही चाहत्यांसोबत शेअर केलं होतं. काही महिन्यांपूर्वी ब्रिटनी स्पीयर्सला तिच्या वडिलांच्या संरक्षणातून स्वातंत्र्य मिळाले होते. याद्वारे ब्रिटनीचे वडील 2008 पासून गायिकेचे आयुष्य आणि पैसा नियंत्रित करत होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

 

हे देखील वाचा