आपल्या मधाळ आवाजानं रसिकांना मंत्रमुग्ध करणारी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त गायिका सावनी रविंद्र (savani ravindra) हिने तेलुगू संगितक्षेत्रात पदार्पण केलं आहे. ‘सदा नन्नु नडिपे’ या तेलुगू सिनेमामधील बरीच गाणी तिने गायली आहेत. ‘सदा नन्नु नडिपे’ या तेलुगू सिनेमाचं टायटल ट्रॅक नुकतचं रिलीज झालं आहे. हे टायटल ट्रॅक प्रेक्षकांच्या पसंतीस पडलं आहे. यापूर्वी सावनीने मराठी, हिंदी, गुजराती, तमिळ, मल्याळम, कन्नडा, कोंकणी अशा प्रादेशिक भाषांमध्ये गाणी गायली आहेत.
सावनी तेलुगू संगितक्षेत्रातील पदार्पणाविषयी सांगते, “मी सावनी ओरीजनल सिरीजमधून अनेक भाषेत गाणी गायली आहेत. यापूर्वी मी तेलुगू भाषेतील गाणी आणि जिंगल्स गायली होती. यावेळेस मी पहिल्यांदाच तेलुगू सिनेमासाठी गाणी गायली आहेत. तेलुगू गाणं गाण्यासाठी मी तेलुगू भाषा शिकली. साऊथच्या कोणत्याही भाषा गाताना खूप चॅलेंजिंग असतं. या भाषा समजायला आणि बोलायला अवघड असतात. परंतु मी याआधी तमिळ, मल्याळम गाणी गायली आहेत. ती गाणी रेकॉर्ड करण्याआधी मी साऊथमधील विविध गाणी सातत्याने ऐकली होती. त्यामुळे या सिनेमातील तेलुगू गाणी गाताना मला थोडं सोप्पं गेलं. या गाण्यांमध्ये ब-यापैकी संस्कृत शब्द आहेत.”
तेलुगू गाण्यांच्या रेकॉर्डिंग विषयी ती सांगते, “संगीत दिग्दर्शकाने हैदराबादवरून मुंबईत येऊन तब्बल दोन दिवसात माझ्याकडून या तेलुगू सिनेमातील सर्व गाणी रेकॉर्ड केली. त्यातील एक गाणं अरमान मलिकचं (arman malik) आहे. एक गाणं माझं आहे. आणि एका गाण्यात मी आणि शुभंकरने डुएट गायले आहे. या गाण्यातील सर्व इमोशन्स, ताल, सूर यांकडे त्यांनी बारकाईने लक्ष दिले आहे. या गाण्यांचे रेकॉर्डींग खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मुंबईत पार पडले.
पुढे ती सांगते, या सिनेमाच्या टायटल ट्रॅकचं संगीत शुभांकर याने केलं आहे. तर या सिनेमाचा नायक आणि दिग्दर्शक प्रतिक प्रेम आहे. माझी मैत्रीण वैष्णवी पटवर्धन ही या सिनेमाची नायिका आहे. या गाण्याचं चित्रीकरण परदेशात झालं आहे. हा सिनेमा २४ जून रोजी हैदराबादमध्ये प्रदर्शित होत आहे. त्यानिमित्ताने माझं तेलुगू संगित क्षेत्रात पदार्पण होत आहे. याचा मला खूप आनंद आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-