Wednesday, June 26, 2024

oscars 2023 live stream: RRR ला अवॉर्ड जिंकताना बघायचे आहे? ऑस्कर लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे आणि कसे पहायचे ते जाणून घ्या

हॉलिवूडच्या सर्वात प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यांपैकी एक ऑस्करच्या प्रसारणासाठी फारच कमी वेळ शिल्लक आहे. 95 व्या अॅकॅडमी अवॉर्ड्सला काही दिवसांत सुरुवात होणार असून, जसजशी तारीख जवळ येत आहे, तसतशी देशातील आणि जगभरातील चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये लवकरच सर्व स्टार्स येणार आहे. जे पाहण्यासाठी आपल्या देशातील प्रेक्षकही उत्सुक आहेत. यावेळचा ‘ऑस्कर’ भारतासाठीही खूप खास आहे. त्याचे कारण असे की, दक्षिण भारतीय ब्लॉकबस्टर चित्रपट ‘RRR’ देखील ऑस्करच्या शर्यतीत सामील झाला आहे. त्यामुळे तमाम भारतीय त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. पण प्रश्न असा पडतो की अमेरिकेत होणारा हा पुरस्कार सोहळा भारतात बसून आपण थेट कसा, कधी आणि कुठे पाहू शकतो? तर चला पाहूया…

हॉलिवूड तसेच जगभरातील सिनेमॅटोग्राफर 95 व्या अकादमी पुरस्कारांसाठी तयारी करत आहेत. चाहते अजूनही गेल्या वर्षीच्या ऑस्कर सोहळ्यात ‘चापट मारलेला’ प्रसंग अजूनही कोणी विसरल नाहीए. यावेळी भारतीय खूप आनंदी आहेत. एकीकडे एसएस राजामौली दिग्दर्शित आणि राम चरण- अभिनीत ‘आरआरआर’ चित्रपट ऑस्करच्या शर्यतीत सामील झाला आहे.

दुसरीकडे, अकादमी अवॉर्ड्सच्या मंचावर ‘नाटू नाटू’ गाण्यावर लाईव्ह परफॉर्मन्सही होणार आहे. या लेखात आपण ऑस्कर पुरस्कार सोहळ्याबद्दल सर्व माहिती पाहणार आहोत

ऑस्कर 2023 कधी आणि कुठे असेल
गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी ऑस्कर पुरस्कार सोहळा अमेरिकेतील लॉस एंजेलिस या शहरातील ‘डॉल्बी थिएटर’मध्ये होणार आहे. 95 वा अकादमी पुरस्कार रविवारी रात्री 12 मार्च रोजी रात्री 8 वाजता ABC PT वर थेट प्रसारित होईल. मात्र, या सोहळ्याचे भारतात 13 मार्च रोजी सकाळी 5.30 वाजता थेट प्रक्षेपण होणार आहे.

तुम्ही ऑस्कर कुठे स्ट्रीम करू शकता?
ऑस्कर 2023 पाहण्यासाठी भारतातील दर्शकांना 13 मार्च रोजी थोडे लवकर उठावे लागेल कारण समारंभ पहाटे 5.30 वाजता सुरू होईल. हा पुरस्कार कार्यक्रम भारतातील दर्शकांसाठी ‘डिस्ने+हॉटस्टार’ वर थेट प्रक्षेपित केला जाईल. याशिवाय, एबीसी नेटवर्क केबल, सिलिंग टीवी, हुलू प्लस लाइव्ह टीव्ही, यूट्यूब टीव्ही आणि फुबो टीव्हीवर प्रसारण उपलब्ध असेल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ram Charan (@alwaysramcharan)


ऑस्कर 2023 भारतीयांसाठी खास का आहे
2023 चे ऑस्कर हे वर्ष भारतासाठी खूप खास आहे कारण एसएस राजामौली यांच्या तेलुगू अॅक्शन चित्रपट ‘RRR’ मधील ‘नाटू नाटू’ हे गाणे ऑस्करसाठी नामांकन करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत या श्रेणीतील ऑस्करकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. यासोबतच बॉलीवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण जिमी किमेल आणि द रॉकसोबत ऑस्कर होस्ट करताना दिसणार आहे. त्यामुळे भारतासाठी ऑस्कर आणखी खास आहे.
(hollywood-oscar-2023-live-streaming-95th-academy-awards-rrr-movie-song-natu-natu-nominate)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
हिंमतीची दादच द्यायला पाहिजे! ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्याने तीन लग्न मोडल्यानंतर चौथ्यांदा पुन्हा बांधली लगीनगाठ
प्रेमाची परिभाषा सांगणारा ‘सरी’ चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

हे देखील वाचा