अबब! अभिनेत्री पॅरिस हिल्टन झाली चौथ्यांदा एंगेज, जाणून घ्या कोण आहे तिचा ‘सोलमेट’

Hollywood Paris Hilton Engaged For Fourth Time Know Who Is The Person Who Stole The Top Singer


‘सरप्राईझ’ हा शब्द ऐकल्यावर नक्कीच आपल्याला आनंदी वाटू लागते. आपल्याला आपल्या वाढदिवशी कुटुंबीय, नातेवाईकांकडून सरप्राईझ मिळत असतेच. परंतु जर एखाद्या सेलिब्रिटीकडून आपल्याला सरप्राईझ मिळणार हे समजल्यावर प्रत्येक चाहत्याला त्या सरप्राईझची उत्सुकता लागलेली असते. अशाच प्रकारे हॉलिवूड अभिनेत्री, मॉडेल आणि गायिका पॅरिस हिल्टनने आपल्या चाहत्यांसाठी एक खास सरप्राईझ दिले आहे.

पॅरिसने आपला बॉयफ्रेंड कार्टर रियमसोबत साखरपुडा करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. पॅरिस हिल्टनचा पती व्यावसायिकरीत्या एक भांडवलदार आहे. या खास क्षणी त्याने पॅरिसला एक डायमंड रिंग (हिऱ्याची अंगठी) दिली आहे.

या खास क्षणाचे काही फोटो पॅरिस हिल्टनने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये हे जोडपं पांढऱ्या रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसत आहे. या पोस्टसह तिने लिहिले की, “तुम्हाला तुमचा पती कुठे मिळेल, काही सांगता येत नाही. माझ्या वाढदिवशी त्याने विशेष ट्रिपचे आयोजन केले आहे.”

या पोस्टमध्ये तिने पुढे लिहिले की, “तो गुडघ्यावर बसला आणि मी कायमसाठी त्याला होकार दिला. असा कोणीही नाही ज्याच्यासोबत मी पूर्ण आयुष्य घालवू शकेल.”

पॅरिसच्या बऱ्याच चाहत्यांना कदाचित हे माहिती नसेल की, कोणासोबत तरी एंगेज होण्याची ही पॅरिसची चौथी वेळ होती. यापूर्वी ती सन २००२ मध्ये जेसन शॉ, सन २००५ मध्ये पॅरिस लॅटसिस आणि सन २०१८ मध्ये अभिनेता ख्रिस जिल्कासोबत एंगेज झाली आहे.

कार्टर एम१३ नावाची गुंतवणूक कंपनीही चालवतो. पॅरिस आणि कार्टर सन २०१९ पासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांमध्येही १५ वर्षांची मैत्री आहे. अशामध्ये दोघांचेही चाहते त्यांच्या भविष्यासाठी त्यांना सोशल मीडियावरून वेगवेगळ्या प्रकारे शुभेच्छा देत आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

 


Leave A Reply

Your email address will not be published.