मौनी रॉयने शेअर केले समुद्रकिनाऱ्यावरील बोल्ड फोटो; सुंदरता पाहून चाहत्यांनी पाडला कमेंट्सचा पाऊस

Bollywood Actress Mouni Roy Latest Photos Went Viral On Social Media


बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी अनेक अभिनेत्रींनी छोट्या पडद्यावर आपली ओळख निर्माण केली आहे. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे ‘मौनी रॉय’. मौनीने सन २००७ मध्ये ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ या मालिकेतून टीव्हीवरील आपल्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली होती. यानंतर तिने अनेक मालिकेत काम केले. त्यानंतर तिने सन २०१८ मध्ये बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमारसोबत ‘गोल्ड’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिच्या सुंदरतेमुळे ती नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते. ती आपले बोल्ड फोटोही शेअर करत असते. नुकतेच तिचे काही नवीन फोटो व्हायरल होत आहेत. 

मौनीने दोन दिवसांपूर्वीच आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर काही नवीन फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ती एकदम हटके आणि बोल्ड अंदाजात दिसत आहे.

मौनीने फोटो शेअर करताच तो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. प्रेक्षकांनीही तिची सुंदरता पाहून कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

व्हायरल झालेल्या या फोटोंमध्ये मौनीने समुद्रकिनारी फोटोशूट केले असून तिने लाल बिकिनी घातली आहे.

मौनीच्या या फोटोंना चाहत्यांकडून भरभरून लाईक्स मिळत आहेत. तसेच तिच्या सुंदरतेची प्रशंसाही केली आहे. मौनी मागील काही महिन्यांपासून आपल्या नवनवीन फोटोंमुळे माध्यमांमध्ये चर्चेत आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.