बॉलिवूड असो किंवा हॉलिवूड, कलाविश्वात ‘मीटू’ या अभियानाने खळबळ माजवली आहे. नुकतेच हिंदी सिनेसृष्टीतील अभिनेता मोहन कपूरवर एका महिलेने मीटूअंतर्गत लैंगिक अत्या’चाराचा आरोप लावला. यानंतर आता आणखी एक प्रकरण समोर येत आहे. अमेरिकेची पॉप स्टार अशांतीने तिच्यासोबत काम केलेल्या एका प्रसिद्ध संगीत निर्मात्यानेविरुद्ध मोठा दावा केला आहे. चला तर काय म्हणाली आहे हॉलिवूड पॉप स्टार अशांती जाणून घेऊया…
अशांतीचे वक्तव्य
पॉप स्टार अशांती (Ashanti) हिने सांगितले आहे की, त्या संगीत निर्मात्याने तिला त्याच्यासोबत अंघोळ करण्यास सांगितले. असे न केल्यास प्रत्येक गाण्यासाठी तिला 40 हजार डॉलर्स देण्यास सांगितले. 42 वर्षीय हॉलिवूड पॉप स्टार अशांती (Hollywood Pop Star Ashanti) हिच्या या खुलास्यामुळे सर्वजण हैराण झाले आहेत.
View this post on Instagram
अनेक आठवडे एकत्र केले होते काम
माध्यमांतील वृत्तांनुसार, पॉप स्टार अशांती हिने दावा केला की, एका संगीत निर्मात्याने तिला त्याच्यासोबत अंघोळ करण्याची मागणी केली होती. तसेच, म्हटले होते की, तिने असे केले नाही, तर तिला त्याच्यासोबत काम करणाऱ्या प्रत्येक ट्रॅकसाठी 40 हजार डॉलर्स द्यावे लागतील. एका रिपोर्टनुसार, गायिकेने म्हटले की, “एका निर्मात्यासोबत वेडे करणारी स्थिती होती.” तिने त्याच्यासोबत अनेक आठवडे काम केले होते. त्याने तिला आदेश दिला की, एकतर नग्न हो किंवा सोबत रेकॉर्ड केलेल्या प्रत्येक ट्रॅकसाठी 40 हजार डॉलर्स दे.
निर्मात्याला करायची गायिकेसोबत करायची होती अंघोळ
एका रेडिओ शोमध्ये बोलताना ती म्हणाली की, “आम्ही एकत्र दोन रेकॉर्ड केले. त्याने मला म्हटले की, ‘ठीक आहे, मी तुझ्याकडून कोणतीही फी घेणार नाही. तू माझी आहेस.’ मात्र, जेव्हा अल्बम लावण्याची वेळ आली, तेव्हा तो म्हणाला की, ‘ठीक आहे, चल एकत्र अंघोळ करूया.’ मला आधी वाटले की, तो चेष्टा करत होता, पण त्याने म्हटले की, तो याबद्दल गंभीर आहे. तो पुढे ‘चल बाहेर जाऊया, किंवा चल एकत्र अंघोळ करूया, मी तुला रेकॉर्ड देईल. असे केले नाही, तर तुला मला प्रत्येक रेकॉर्डसाठी 40 हजार डॉलर्स द्यावे लागतील,’ असे म्हणाला.”
‘मला वाटलं तो चेष्टा करतोय’
अशांतीने पुढे खुलासा करत म्हटले की, या प्रस्तावानंतर तिने खात्री केली की, स्थिती ‘नियंत्रित’ होती. ती म्हणाली, “मला वाटले, तो चेष्टा करत होता. कारण, आम्ही काही आठवड्यांपासून एकत्र काम करत होतो. मात्र, मला समजले की, तो गंभीर होता. मला काही फोन करायचे होते आणि गोष्टी सांभाळल्या जात होत्या.”
या घटनेनंतर शोचा होस्टदेखील अशांतीच्या खुलास्यामुळे हैराण झाला होता. (hollywood pop star ashanti disclosure of the producer said first take a bath with me)
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
‘मला तर वाटतं ही…’, पाकिस्तानी अभिनेत्रीने ‘तसले’ फोटो शेअर करताच भडकले युजर्स
बाबो! 5 वर्षांचा असताना हरवला होता तुषार कपूर; म्हणाला, ‘ते नसते तर आज मी इथं नसतो’