Friday, July 5, 2024

लज्जास्पद! हॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकावर एक्स गर्लफ्रेंडने लावला बलात्काराचा आरोप; १५ महिलांनी पूर्वीच केलीय तक्रार

हॉलिवूड गायक आणि रॉकस्टार मर्लिन मॅन्सन पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. गायकावर बलात्कार आणि लैंगिक छळ केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. हा आरोप त्याची पूर्वाश्रमीची गर्लफ्रेंड जेन डो हिने लावला आहे. तिने हैराण करणारा खुलासा करत सांगितले की, गायकाने सन २०११ मध्ये अनेकवेळा तिच्यावर बलात्कार केला होता.

तिने सांगितले की, तिने गायक मर्लिनला १० वर्षांपेक्षाही अधिक काळ डेट केले होते. यादरम्यान त्याने अनेकवेळा तिच्यावर बलात्कार केला. आपल्या आरोपात तिने सांगितले आहे की, “मर्लिन मॅन्सनने मला जीवे मारण्याची धमकी दिली आणि जबरदस्ती ओरल सेक्ससाठी प्रवृत्त केले. त्यानंतर जेव्हा मॅन्सनच्या घराच्या चाव्या परत करण्यासाठी गेले, तेव्हा त्याने पुन्हा मला जीवे मारण्याची धमकी देत पुन्हा बलात्कार केला.”

“मॅन्सनने दुसऱ्या एका महिलेवर बलात्कार करतानाचा आपला एक व्हिडिओही दाखवला होता,” असेही तिने सांगितले. या व्हिडिओच्या क्लिपमध्ये मॅन्सनने एका महिलेला खुर्चीला बांधून ठेवले होते. तसेच तो तिला आपली लघुशंका पिण्यासाठी देत होता. जेनने असाही दावा केला की, “व्हिडिओमध्ये मॅन्सन त्या महिलेला आग लावून जाळण्याची धमकीही देत आहे.”

लॉस एंजेलिस पोलीस आता या सर्व आरोपांचा तपास करत आहे. तरीही मर्लिन मॅन्सनच्या टीमने या सर्व आरोपांना नाकारले आहे. मॅन्सनवर गंभीर आरोप लावण्याची ही पहिली वेळ नाहीये. यापूर्वीही त्याच्यावर अनेक महिलांनी बलात्काराचे आरोप लावले आहेत. गायकाची माजी असिस्टंट ऍश्ले वॉल्टर, मॉर्गन स्मिथलाईन, अभिनेत्री इवान रॅचेल वुड आणि ‘गेम्स ऑफ थ्रॉन्स’मध्ये काम केलेली अभिनेत्री एजमी बीआनकोसह १५ महिलांनी मर्लिन मॅन्सनवर बलात्काराचे आरोप लावले आहेत. इतकेच नव्हे, तर अमेरिकन गायक फीबी ब्रिजर्सने एकदा खुलासा केला होता की, गायकाच्या घरात एक बलात्कार करण्याची खोली बनवली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा