Tuesday, July 9, 2024

बापरे! सुपरस्टार टॉम क्रूझची आलिशान कार शूटिंगदरम्यान झाली चोरी; ‘इतक्या’ किमतीचं सामान गायब

हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझ सध्या चर्चेचा विषय बनला आहे.  याचे कारण त्याचा चित्रपट नसून कार चोरीचे प्रकरण आहे. टॉम बर्मिंघममध्ये ‘मिशन इम्पॉसिबल ७’ चित्रपटाची शूटिंग करत होता. त्यावेळी त्याची बीएमडब्ल्यू ही आलिशान कार चोरीला गेली. ही कार हॉटेलच्या बाहेर उभी केली होती. तेथून ती गायब झाली. पोलिसांनी ती कार परत मिळवली, परंतु तोपर्यंत कारमधून हजारो पौंड किमतीचं सामान चोरीला गेले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता टॉम क्रूझ जेव्हा त्याच्या चित्रपटाचे शूटिंग करत होता, तेव्हा त्याची कार हॉटेलच्या बाहेर उभी होती. त्याच्या बॉडीगार्डला पार्किंगच्या जागेतून कार गायब असल्याचे लक्षात आल्यावर ही चोरी उघडकीस आली. वृत्तानुसार, चोराने कारच्या इग्निशनमधून सिग्नलचे क्लोनिंग करून चावीशिवाय गाडी चोरली. चोराने गाडी थोडा वेळ फिरवली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना चर्च स्ट्रीट बर्मिंगहॅममधून एका कारची चोरी झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारचा शोध घेतला. टॉमच्या कारला इलेक्ट्रॉनिक उपकरण बसवण्यात आले होते. ज्यामुळे कार थोड्या वेळाने स्मेथविक भागातून परत मिळाली, परंतु या कारमध्ये ठेवलेल्या अनेक मौल्यवान वस्तू गायब झाल्या. या संदर्भात पोलीस सीसीटीव्ही कॅमेरे आणि आजूबाजूच्या लोकांची चौकशी करत आहेत. ही घटना तेथील पोलिसांसाठी अत्यंत लाजीरवाणी आहे.

या चित्रपटाच्या शूटिंगच्या संदर्भात टॉम गेल्या अनेक महिन्यांपासून यूकेमध्ये राहत आहे. कारण त्याने ‘हेले अटवेल’ आणि ‘व्हेनेसा किर्बी’ यांच्यासारख्या नवीन “मिशन इम्पॉसिबल” चित्रपटाची निर्मिती केली आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला एका सूत्राने सांगितले होते की, तो यूकेमध्ये राहणे अधिक पसंत करतो.

काही दिवसांपूर्वीच त्याच्या चित्रपटातील स्टंट सीनचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता. ‘मिशन इम्पॉसिबल ७’ची टीम एका सीनची शूटिंग करत आहे. ज्यामध्ये खडकावर आदळून ट्रेन अपघातग्रस्त होते. हा शानदार ऍक्शन सीन नुकताच डर्बीशायरमध्ये शूट करण्यात आला आहे.

मिशन इम्पॉसिबल ७’च्या लेटेस्ट स्टंट शूटिंगवेळी उपस्थित स्थानिक फोटोग्राफर जिमने हा क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आहे. तसेच हा व्हिडिओ सोशल मीडियावरही शेअर केला आहे. यासोबतच त्याने लिहिले आहे की, “२० मिनिटांपूर्वी शूट केलेल्या या सीनसाठी ५ महिन्यांपासून वाट पाहत होतो. मिशन: इम्पॉसिबलच्या शूटिंगवेळी टॉम क्रूझही उपस्थित होता. अप्रतिम दिवस!!” विशेष म्हणजे हा स्टंट शूट करताना तेथे एक हेलिकॅप्टरही उडताना दिसले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सलमानला पहिल्या चित्रपटासाठी मिळाले होते ‘इतके’ मानधन; आज एवढ्या पैशांमध्ये साधा स्मार्टफोनही नाही येत

-‘कमरिया गर्ल’नंतर आता ‘बेबो’ बनली आकांक्षा दुबे; करीनाची नक्कल करत दाखवल्या हॉट अदा

-‘राधा कैसे ना जले…’, म्हणत ‘धकधक गर्ल’ने पुन्हा एकदा चुकवला चाहत्यांचा काळजाचा ठोका

हे देखील वाचा