सलमानला पहिल्या चित्रपटासाठी मिळाले होते ‘इतके’ मानधन; आज एवढ्या पैशांमध्ये साधा स्मार्टफोनही नाही येत

सुपरस्टार सलमान खान आपल्या दमदार अभिनयाप्रमाणेच दमदार मानधन देखील घेतो. त्याच्या चित्रपटातील अभिनयाने तो चाहत्यांची मने जिंकतो. सलमान सध्या त्याच्या एका चित्रपटासाठी कोट्यवधी रुपये मानधन घेतो. त्याच्या एवढ्या मोठ्या मानधनामुळे कमी बजेटवाले दिग्दर्शक त्याला आपल्या चित्रपटात कास्ट करण्याचे स्वप्नही पाहू शकत नाहीत. सलमानच्या अभिनयाची जादू चाहत्यांच्या मनात घर करून बसली आहे. त्याची दमदार शरीरयष्टी तरुणाईला वेड लावते. अनेक तरुण त्याच्याप्रमाणे शरीरयष्टी बनवण्यासाठी मोठी कसरत करत असतात.

सलमान सध्या ५० ते ६० कोटी रुपये मानधन घेतो, परंतु तुम्हाला माहिती आहे का, त्याने पहिल्या चित्रपटासाठी किती मानधन घेतले होते? (Superstar Salman Khan first ever salary amount will shock you)

दबंग खानने आपल्या चित्रपटात कारकिर्दीची सुरुवात साल १९८८ मध्ये ‘बीवी हो तो ऐसी’ या चित्रपटातून केली. या चित्रपटामध्ये रेखा, फारूक शेख आणि बिंदू यांच्यासारख्या मोठ्या कलाकारांबरोबर त्याला काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटामध्ये त्याला फारूक शेख यांच्या लहान भावाची भूमिका साकारायची होती.

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

एका वृत्तपत्रात छापलेल्या बातमीनुसार, सलमानला पहिल्या चित्रपटासाठी फक्त ११ हजार रुपये मिळाले होते. सध्या या किमतीत साधा स्मार्टफोन देखील येत नाही. आपल्या मानधनाचा खुलासा स्वतः सलमानने एका इंटरव्यूमध्ये केला होता. तसेच या चित्रपटामध्ये काम करत असताना सालमानच्या पदरी एक छोटा रोल पडला होता.त्यासाठी तो स्वतःच त्याचे कपडे घेऊन येत होता. सेटवर त्याच्यासाठी काहीच सुविधा नव्हती. त्याच्या या पहिल्या चित्रपटातील अभिनयानेच त्याच्या आयुष्याला कलाटणी दिली. या चित्रपटातील त्याचा अभिनय चाहत्यांना खूप आवडला.

त्याच्या आयुष्यातील या पहिल्या चित्रपटाने त्याला खूप काही शिकवले. मेहनत करण्याची तयारी आणि मनामध्ये जिद्द असेल, तर काहीही अशक्य नसते. सलमानचे सर्वच चित्रपट तुम्ही पाहिले असतील. यामध्ये ११ हजार रुपये मानधनापासून ते आता ६० कोटी रुपये मानधन कमावण्यासाठी त्याने देखील मोठी मेहनत घेतली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘कमरिया गर्ल’नंतर आता ‘बेबो’ बनली आकांक्षा दुबे; करीनाची नक्कल करत दाखवल्या हॉट अदा

-‘राधा कैसे ना जले…’, म्हणत ‘धकधक गर्ल’ने पुन्हा एकदा चुकवला चाहत्यांचा काळजाचा ठोका

-‘या’ कलाकारांनी किस करून लावली होती पडद्यावर आग; आमिर अन् करिश्माचाही आहे समावेश

Latest Post