Thursday, January 22, 2026
Home हॉलीवूड ‘आमच्या मागे फिरणे सोडा’, पॅपराजींना कंटाळली प्रियांका चोप्राची जेठाणी सोफी टर्नर; अंधारातील व्हिडिओ केला शेअर

‘आमच्या मागे फिरणे सोडा’, पॅपराजींना कंटाळली प्रियांका चोप्राची जेठाणी सोफी टर्नर; अंधारातील व्हिडिओ केला शेअर

हॉलिवूड अभिनेत्री आणि प्रियांका चोप्राची जेठानी सोफी टर्नर पॅपराजीमुळे नाराज झाली आहे. सोफी चिडण्यामागील कारण म्हणजे, जेव्हा जेव्हा ती मुलगी विलाला घेऊन घराबाहेर पडते, तेव्हा पॅपराजी तिच्याच मागे असतात. त्यांच्या परवानगीशिवाय छायाचित्रे घेतात, आणि मुलीचे छायाचित्र शेअर करतात.

सोफी टर्नरने इंस्टाग्राम स्टोरीवर व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “छायाचित्रकारांच्या अशा वागण्याचा खूप राग येतो आहे.”

सोफी टर्नर आणि तिचा पती सिंगर जो जोनास हे दोघेही आपली मुलगी विलाची छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट करत नाहीत. अशा परिस्थितीत, सोफीला तिच्या मुलीचे छायाचित्र काढणे, आणि ते छापणे आवडलेले नाही. सोफीने अंधारात बनवलेला स्वतःचा व्हिडिओ शेअर केला आहे.

व्हिडिओमध्ये सोफी टर्नर म्हणते, “मी नुकतीच जागी होत आहे. मला वाटतं की, काल काही पॅपराजी माझ्या मुलीचे छायाचित्रे काढण्यात यशस्वी झाले आहेत, आणि मला फक्त म्हणायचे होते की, मी माझ्या मुलीचे छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट करत नाही आणि हे लक्षात ठेवते की, कोणत्याही परिस्थितीत पॅपराजीपासून वाचले पाहिजे. मला मुलीची छायाचित्रे सोशल मीडियावर नको आहेत.”

सोफी पुढे म्हणाली, “ती माझी मुलगी आहे. तिने हे असले जीवन मागितलेले नव्हते, आणि तिला फोटोही काढून घ्यायचे नव्हते. एक मध्यमवयीन माणूस, लहान मुलीचे फोटो तिच्या मर्जीविरुद्ध काढत आहेत हे घृणास्पद आहे. यामुळे मी वैतागले आहे, आणि मी तुमच्या सर्वांना आदरपूर्वक आवाहन करते की, कृपया आमच्या मागे मागे फिरणे थांबवा आणि आमचे छायाचित्रे काढणे थांबवा. विशेषत: छापणे थांबवा. हे घृणास्पद आहे. माझी या सर्वांना अजिबात परवानगी नाही.”

सोफी टर्नर, आणि जो जोनास यांनी अद्याप मुलगी विलाचे कोणतेही चित्र सोशल मीडियावर पोस्ट केलेले नाहीत. जो आणि सोफी दोघांनीही अभिनेत्रीच्या गरोदरपणाविषयी जाहीरपणे कधीच बोलले नाही. जुलै २०२० मध्ये विलाचा जन्म झाला होता. जो आणि सोफीच्या लग्नाबद्दल बोलायचं झालं, तर दोघांचे लग्न २०१९ मध्ये लास वेगासमध्ये एका खासगी  सोहळ्यात लग्न केले होते. तिथे दोघांनी एकमेकांना रिंग घातली होती. दोन महिन्यांनंतर, दोघांनी संपूर्ण विधी आणि रीतिरिवाजांनी फ्रान्समध्ये पुन्हा लग्न केले होते. लग्नात या खुश जोडप्याबरोबरच, निक आणि प्रियांका चोप्रा यांचीपण खूप चर्चा झाली.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बाबो!! इजिप्तच्या सुपरस्टारसोबत रोमान्स करताना दिसली उर्वशी रौतेला, पहिला इंटरनॅशनल म्युझिक व्हिडिओ झाला रिलीझ

-जमलंय म्हणायचं! सुगंधा मिश्राने केला लता दीदींची मिमिक्री करतानाचा व्हिडिओ शेअर, सांगितला भोसले होण्यापर्यंतचा प्रवास

-‘तेव्हा खिसा रिकामा असायचा, पण…’, म्हणत कपिल शर्माने शेअर केला २३ वर्ष जुना फोटो, सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

हे देखील वाचा