Sunday, March 23, 2025
Home बॉलीवूड बाबो!! इजिप्तच्या सुपरस्टारसोबत रोमान्स करताना दिसली उर्वशी रौतेला, पहिला इंटरनॅशनल म्युझिक व्हिडिओ झाला रिलीझ

बाबो!! इजिप्तच्या सुपरस्टारसोबत रोमान्स करताना दिसली उर्वशी रौतेला, पहिला इंटरनॅशनल म्युझिक व्हिडिओ झाला रिलीझ

मॉडेलिंगच्या क्षेत्रातून करिअरची सुरुवात करणारी अभिनेत्री उर्वशी रौतेला आज बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती कायमच आपल्या अदांनी चाहत्यांना घायाळ करत असते. ती बॉलिवूडमधील ‘फॅशन क्वीन’ म्हणून ओळखली जाते. तिची एक झलक बघण्याकरता चाहते आतुर असतात. ती कायमच आपले आकर्षक फोटो चाहत्यांना शेअर करत असते. ती सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी ती ‘डूब गये’ या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती. आता ती इजिप्तच्या सुपरस्टारसोबत रोमान्स करताना दिसत आहे. होय, तिचा पहिला आंतरराष्ट्रीय म्युझिक व्हिडिओ प्रदर्शित झाला आहे.

उर्वशी रौतेलाचा नुकताच ‘डूब गये’ हा म्युझिक व्हिडिओ प्रसिद्ध झाला. या गाण्यात ती पंजाबी गायक गुरु रंधावासोबत दिसली होती. गाण्यात चाहत्यांना दोघांची जोडी आवडली आहे. हे गाणे आजही सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे. यादरम्यान, उर्वशी तिच्या चाहत्यांसाठी ईदची भेट घेऊन आली आहे.

उर्वशीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचे नवीन गाणे प्रदर्शित झाल्याची माहिती दिली आहे. या गाण्यात ती खूपच सुंदर स्टाईलमध्ये दिसत आहे. तिने कॅप्शनमध्ये असेही लिहिले आहे की, ‘ईदच्या या खास प्रसंगी VERSACE BABY रिलीज करण्यात आले आहे.’ या म्युझिक व्हिडिओमध्ये ती इजिप्त सुपरस्टार मोहम्मद रमजानसोबत दिसली आहे. या व्हिडिओला एकाच दिवसात १९ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

उर्वशी रौतेलाच्या करिअरची सुरुवात एक्शन रोमांसवर आधारित ‘सिंग साहब द ग्रेट’ या चित्रपटापासून झाली होती. या चित्रपटात ती सनी देओलच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली होती. उर्वशी रौतेलाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती लवकरच जियो स्टुडिओच्या आगामी ‘इस्पेक्टर अविनाश’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या वेब सीरिजमध्ये उर्वशी रणदीप हुड्डासोबत दिसणार आहे. यासह उर्वशी रौतेला लवकरच तमिळ चित्रपटात पदार्पण करणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-स्वत: शाहरुख खानने मुलगा आर्यनला घरात विना शर्ट फिरण्यावर घातली होती बंदी, कारण जाणून तुम्हीही म्हणाल, ‘योग्य निर्णय!’

-जेव्हा १६ वर्षीय जन्नत झुबेरच्या किसींग सीनवर भडकली होती आई, वडिलांनी दिली होती अशी प्रतिक्रिया

-‘तेव्हा खिसा रिकामा असायचा, पण…’, म्हणत कपिल शर्माने शेअर केला २३ वर्ष जुना फोटो, सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ

हे देखील वाचा