Saturday, August 9, 2025
Home बॉलीवूड हनीमूनला गेल्यावर हनी सिंगने पत्नीसोबत केले होते ‘असे’ काही; शालिनीचा धक्कादायक खुलासा

हनीमूनला गेल्यावर हनी सिंगने पत्नीसोबत केले होते ‘असे’ काही; शालिनीचा धक्कादायक खुलासा

बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक हनी सिंग अचानक चर्चेत आला आहे. मनोरंजन क्षेत्रात आपल्या संगीताच्या जोरावर अनेकांची मने जिंकणारा हनी सिंग वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याची पत्नी शालिनी तलवारने त्याच्यावर कौटुंबिक हिंसाचार, मानसिक आणि आर्थिक शोषणकेल्याचा आरोप केला आहे.

शालिनीने हनी सिंगच्या विरोधात दिल्लीच्या न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यानंतर न्यायालयाने गायकाविरुद्ध नोटीस जारी केली आहे आणि त्याच्याकडून उत्तर मागितले आहे. शालिनीने दाखल केलेल्या याचिकेत तिने 10 वर्षांंपूर्वीच्या हनीमूनचे रहस्य उलगडले आहे, ज्याबद्दल कोणालाही आजतागायत कसलीच माहिती नव्हती. शालिनीने सांगितले की, हनीमून दरम्यान हनी सिंगने तिच्यावर हल्ला केला होता.

शालिनीने याचिकेत अनेक खुलासे केले
शालिनी तलवारने आपल्या याचिकेत म्हटले आहे की, ती आणि हनी शाळेत एकत्र शिकत होते. यादरम्यान दोघांचे अफेअर सुरू झाले. ते दोघे जवळपास १० वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. १४ मार्च, २०१० रोजी दोघांनी कुटुंबाच्या इच्छेनुसार विवाह करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर २३ जानेवारी, २०११ रोजी दोघांनी लग्न केले.

तिने याचिकेत पुढे असे सांगितले की, जेव्हा दोघे लग्नानंतर हनीमूनसाठी मॉरिशयसला पोहोचले, तेव्हा तिला हनीचे वागणे, बोलणे खूप बदलल्याचे आढळले. तो बहुतेक गप्प होता. पण अशा परिस्थितीत जेव्हा शालिनीने त्याला स्वत:विषयी विचारले तेव्हा, हनी तिच्यावर प्रचंड चिडला. रागाच्या भरात हनी सिंगने शालिनीला बेडवर जोरात ढकलून दिले. यानंतर तो ओरडला की, “जर हनी सिंगला प्रश्न विचारण्याचे धाडस आजपर्यंत कोणामध्येच नाही तर, तू मला कशी प्रश्न विचारू शकतेस.”

हनीमूनसाठी गेल्यावर पत्नीला मारहाण
यानंतर हनी सिंगने तिला सांगितले की, “मी लग्नामुळे आधीच अस्ताव्यस्त झालो आहे. मला लग्न करायचे नव्हते. मात्र, मी तुला वचन दिले होते, म्हणून मला लग्न करावे लागले.” या गोष्टी ऐकून शालिनीला वाईट वाटले. यानंतर हनी सिंग खोलीतून बाहेर निघून गेला आणि दहा ते बारा तास परत आलाच नाही. शालिनीने हनी सिंगला परत न येण्याचे कारण विचारले, त्यामुळे त्याने तिला बेदम मारहाण केली. हनीमून दरम्यानच दोघांचे सर्व संबंध बिघडले होते.

हनी सिंगचे इतर महिलांशी शारीरिक संबंध आहेत?
इतकेच नाही तर शालिनी तलवारनेही आपल्या याचिकेत हनी सिंगचे इतर महिलांशी शारीरिक संबंध असल्याचाही आरोप केला आहे. शालिनी म्हणाली की, हनी तिला कोणत्याही दौऱ्यावर घेऊन जात नाही. तसचे तिला सारखी मानहाण करत असतो.

हनी सिंगने त्याच्या लग्नाचे कोणत्याही प्रकारचे सेलिब्रेशन केले नाही. त्याने एंगेजमेंट रिंग देखील काढून टाकली आणि म्हणाला की, मी हिरे परिधान करत नाही. हनी सिंगने शालिनीसोबतचे लग्न तीन वर्षे सर्वांपासून लपवून ठेवले होते. २०१४मध्ये, त्याने पहिल्यांदा एका शोमध्ये आपल्या पत्नीची चाहत्यांशी ओळख करून दिली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अनुष्काला पाहून विराट कोहली बनला शम्मी कपूर; सौंदर्याचे कौतुक करत म्हणतोय, ‘चांद सा रोशन चेहरा’

-तब्बल ५ मिनिटे किसींग सीन दिल्यावर बेशुद्ध झाली होती रेखा; दिग्दर्शकाने कट म्हणूनही थांबला नव्हता अभिनेता

-तेजस्विनी पंडितच्या ‘कूल ऍंड डॅशिंग’ लूकने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष, कलाकारांच्या देखील उमटतायेत प्रतिक्रिया

हे देखील वाचा