सरकारचा मोठा निर्णय! पुनीत राजकुमारला मरणोत्तर कर्नाटक रत्न पुरस्काराने करण्यात येणार सन्मानित


कर्नाटक सरकारने मंगळवारी (१६ नोव्हेंबर) घोषणा केली की, दिवंगत सुपरस्टार पुनीत राजकुमार याला मरणोत्तर कर्नाटक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून ही घोषणा केली आहे. पुनीत राजकुमार हा कर्नाटक रत्न पुरस्कार मिळविणारा १०वा व्यक्ती आहे. हा पुरस्कार कर्नाटकचा सर्वोच्च पुरस्कार आहे.

पुनीत याचे २९ ऑक्टोबर, वयाच्या ४६ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पुनीत राजकुमार हा कर्नाटक चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार डॉ. राजकुमार यांचा मुलगा होता. अभिनेता राजकुमार यांना पाच मुले होती, त्यापैकी पुनीत सर्वात लहान होता. (honor government announced superstar puneet rajkumar will get karnataka ratna after his death)

श्रद्धांजलीच्या कार्यक्रमात करण्यात आली घोषणा
कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्सच्या एका कार्यक्रमात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी या पुरस्काराची घोषणा केली. पुनीत राजकुमारला श्रद्धांजली वाहण्यासाठी हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाचे नाव ‘पुनीत नामना’ असे ठेवण्यात आले होते.

वडिलांनाही करण्यात आले होते सन्मानित
पुनीतचे वडील अभिनेता राजकुमार यांनाही कर्नाटकच्या या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. १९९२ मध्ये त्यांना कर्नाटक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना कवी कुवेंपूसह हा कर्नाटक रत्न पुरस्कार देण्यात आला होता. अखेरच्या वेळी हा पुरस्कार डॉ. वीरेंद्र हेगडे यांना २००९ साली समाजसेवेसाठी देण्यात आला होता.

बड्या व्यक्तींना मिळालाय हा सन्मान
चित्रपट कलाकारांव्यतिरिक्त, कर्नाटक रत्न राज्यातील अनेक बड्या आणि प्रतिष्ठित व्यक्तींना मिळाला आहे. यामध्ये राजकारणाशी संबंधित असलेले एस निजलिंगप्पा, शास्त्रज्ञ सीएनआर राव, वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित डॉ. देवीप्रसाद शेट्टी, संगीत जगताशी संबंधित भीमसेन जोशी, समाजसेवक शिवकुमार स्वामीजी आणि डॉ. जे जावरे गौडा यांचा समावेश आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Bigg Boss 15: राकेश बापट गेल्यानंतर शमिता शेट्टीलाही काढावं लागलं बाहेर, पण का?

-ओढणीआड लपलेल्या नोरा फतेहीचा देसी लूक पाहून चाहते झाले वेडे, नेटकरी म्हणाले, ‘हाय गर्मी’

-ठरलं तर! अंकिता लोखंडेने व्यक्त केली लग्नाविषयीची भावना, ‘या’ तारखेला घेणार सात फेरे


Latest Post

error: Content is protected !!