रोमॅंटिक, विनोदी, ऍक्शन, सस्पेन्स, हॉरर, ड्रामा असे विविध प्रकारचे सिनेमे तयार होता असतात. प्रत्येक प्रकारचा आपला एक प्रेक्षक असतो. विशिष्ट प्रेक्षकांना विशिष्ट प्रकारचेच सिनेमे पाहायला आवडतात. या सर्वांमध्ये हॉरर हा प्रकार बहुतकरून सर्वांनाच आवडतो. आपल्या देशातील अनेकांना असे वाटते की, बॉलिवूडपेक्षा हॉलीवूडमधले हॉरर सिनेमे अधिक चांगले आणि जास्त भीतीदायक असतात. त्यामुळेच सर्वांना हॉलिवूडच्या हॉरर, सस्पेन्स चित्रपटांची खूपच उत्सुकता असते. हीच उत्सुकता कमी करण्यासाठी नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे, ‘हायप्नोटिक’ हा हॉरर थ्रिलर सिनेमा.
रिचर्ड डी’ओव्हिडिओ लिखित आणि मॅट एंजल आणि सुझान कुटे यांनी दिग्दर्शित केलेला मानसशास्त्रीय भयपट-थ्रिलर ‘हायप्नोटिक’ नुकताच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. हा सिनेमा एक सायकॉलॉजिकल ड्रामा आहे. व्यावसायिक आणि वैयक्तिक या दोन्ही आयुष्यातील समस्यांमध्ये अडकलेली जेन यातून बाहेर पाडण्यासाठी प्रयत्न करत असते. तिला उठून बाहेर काढण्यासाठी संमोहन चिकित्सक, डॉ. मीड मदत करत असतात. मात्र यादरम्यान ती मानसिक आजारात अडकायला सुरूवात होते. यातून ती बाहेर पडते की नाही का अजून अडकत जाते हे हा सिनेमा पाहिल्यावर समजेल.
मिडनाईट मास आणि द हॉंटिंग ऑफ ब्लाय मॅनोर मधील अभिनेत्री केट सिगल या सिनेमात मुख्य भूमिका साकारत असून, तिच्यासोबत SHIELD फेम जेसन ओ’मारा, लुसी गेस्ट, जेम एम. कॅलिका, तान्जा डिक्सन-वॉरेन, डॅरिएन मार्टिन,डॉ. कॉलिन मीड, ल्यूक रॉडरिक आदी कलाकार चित्रपटात दिसणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-भ्रष्टाचारांच्या आरोपांमध्ये दिल्लीला पोहचले वानखेडे; ‘कामानिमित्त आलो आहे’, म्हणत दिले स्पष्टीकरण