Tuesday, August 5, 2025
Home अन्य गृहिणी गीता सिंग गौर यांनी जिंकले १ कोटी रुपये, बनल्या ‘केबीसी १३’ मधील तिसऱ्या करोडपती

गृहिणी गीता सिंग गौर यांनी जिंकले १ कोटी रुपये, बनल्या ‘केबीसी १३’ मधील तिसऱ्या करोडपती

‘कौन बनेगा करोडपती १३’ च्या निर्मात्यांनी अलीकडेच एका एपिसोडचा प्रोमो प्रदर्शित केला आहे. ज्यामध्ये शोला आता तिसरा करोडपती विजेता मिळाला असल्याचे दाखवण्यात आले आहे. ५३ वर्षांची आणि गृहिणी असलेल्या गीता सिंग गौर यांनी अमिताभ बच्चन यांच्या शोमध्ये १ कोटी रुपये जिंकले आहेत. हा भाग सोमवारी (८ नोव्हेंबर) प्रसारित होईल.

गीता सिंग गौरने १ कोटी जिंकल्यानंतर ७ कोटींचा खेळला जॅकपॉट प्रश्न
प्रोमोमध्ये गीता सिंग गौर १ कोटी जिंकल्यानंतर ७ कोटींच्या जॅकपॉट प्रश्नासाठी गेम खेळताना दिसत आहेत. १ कोटीची रक्कम जिंकल्यावर, अमिताभ बच्चन आपल्या जागेवरून उभे राहून गीता यांना प्रोत्साहन देताना आणि त्यांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. एक कोटी रुपयांचे अचूक उत्तर दिल्यानंतरही अमिताभ बच्चन आनंदाने ओरडत असल्याचे प्रोमोमध्ये दिसून येते.

प्रोमोमध्ये गीता त्यांच्या आयुष्यातील दुसऱ्या इनिंगबद्दल सांगत असल्याचे दाखवण्यात आले आहे. प्रोमोमध्ये त्या सांगतात की, त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य मुलांचे संगोपन करण्यात घालवले आहे, परंतु दुसऱ्या डावात त्या स्वतःसाठी जगण्याची आकांक्षा बाळगतात. गीता गौर यांचा विवाह अवघ्या १९ व्या वर्षी झाला होता. यानंतर त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य मुलांचे संगोपन करण्यात घालवले.

आग्र्याच्या शिक्षिका हिमानी बुंदेला या सीझनच्या सुरुवातीला बनली होती करोडपती
हिमानीचा अपघात झाला होता. त्यानंतर कालांतराने तिची दृष्टी गेली. हिमानीचे वडील विजय बुंदेला यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, हिमानी १५ वर्षांची असताना एका अपघातात तिची दृष्टी गेली. डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हिमानीला भविष्य अंधारात बुडताना दिसले. मात्र, घरच्यांनी तिला प्रोत्साहन दिले. पदवी आणि बीएडनंतर हिमानीची केंद्रीय विद्यालयात निवड झाली. यासोबतच हिमानीने असेही सांगितले होते की, ती गेल्या पाच वर्षांपासून सातत्याने केबीसीमध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘भाईजान’च्या तळपायाची आग मस्तकात! सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्यावर भडकला सलमान, म्हणाला, ‘तू नाचणं…’

-ही दोस्ती तुटायची नाय! आशिष चंचलानीला दिलेले ‘ते’ वचन पूर्ण करण्यासाठी रोहित शेट्टी पोहोचला उल्हासनगरमध्ये

-कमल हसन यांच्या ‘विक्रम’ सिनेमाने प्रदर्शनाआधीच केला रेकॉर्ड, चित्रपटाच्या फर्स्ट लुकला प्रेक्षकांचा अमाप प्रतिसाद

हे देखील वाचा