बिग बॉस मराठीचा नवीन सिझन सुरु झाला आहे. या नवीन सिझनला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहेत. शो मध्ये दररोज होणाऱ्या गमती जमतींनी प्रेक्षकांचं चांगलं मनोरंजन होत आहे. या सिझनमध्ये शोचा होस्ट बदलला असून यावेळी अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) शोचं सूत्रसंचालन करत आहे. मागील चार सिझन दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी होस्ट केले होते.
तुम्हाला माहिती आहे का, कि रितेश हा शो होस्ट करण्याचे किती पैसे घेतो आहे ? रितेशच्या मानधनाच्या बाबतीत नवीन माहिती समोर आली आहे. माहितीनुसार रितेश प्रत्येक एपीसोडसाठी ३० ते ४० लाख रुपये चार्ज करत आहे. यापूर्वी महेश मांजरेकर हे प्रती एपिसोड २५ लाख रुपये घेत होते. रितेशच्या एकूण मानधनाचा हिशोब लावला तर ते दोन ते अडीच कोटींच्या जवळपास आहे. एका सिनेमासाठी रितेश ८ ते १० कोटी रुपये चार्ज करतो.
दरम्यान बिग बॉस च्या या नवीन सिझन मध्ये दररोज वेगवेगळ्या घडामोडी घडत असल्याने प्रेक्षकांची पसंती शो ला मिळत आहे. सदस्य एकमेकांबद्दल अनेक गोष्टी बोलताना दिसतात ज्यामुळे वेगवेगळे किस्से होतात.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
बिग बॉस OTT 3 चा फायनलिस्ट साई केतन राव विषयी या गोष्टी माहिती आहेत का ? राज्यस्तरीय बॉक्सर होता अभिनेता
‘जोपर्यंत लोक मला गोळी मारत नाही तोपर्यंत मी काम करेन!’ अपयशाच्या प्रश्नावर अक्षयचे सडेतोड उत्तर…