Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड जेवढ्या चांगल्या सवयी तितका यशस्वी माणूस! असा होता लता मंगेशकर यांचा दिनक्रम

जेवढ्या चांगल्या सवयी तितका यशस्वी माणूस! असा होता लता मंगेशकर यांचा दिनक्रम

गेली सात दशकं ज्यांनी संगीत सृष्टीवर अधिराज्य गाजवले आहे त्या म्हणजे गान कोकिळा लता मंगेशकर. लता मंगेशकरांनी रविवारी(६ फेब्रुवारी) सकाळी मुंबईतील कॅंडी ब्रिच रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने आज संपूर्ण कलाविश्व पोरके झाले आहे. अनेक क्षेत्रातून त्याच्या मृत्यूवर हळहळ व्यक्त केली जात आहे. अगदी परदेशातून देखील त्यांच्यावर श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.

बॉलिवूडला त्यांनी एका पेक्षा एक सुपरहिट गाणी दिली आहेत. असं म्हणतात की, एखादा माणूस जेव्हा मोठा होता तेव्हा तो एकटा मोठा होत नाही त्यासाठी त्याच्या सवयी देखील तितक्याच जबाबदार असतात. चांगल्या सवयी जोपासलेला माणूस नक्कीच आयुष्यात यशस्वी होतो. लता मंगेशकर यांनी तर तब्बल ७ दशकं त्यांच्या करीअरचा प्रवास केला आहे. एवढे वय झाले असताना देखील त्यांनी सुदृढपणे हा प्रवास केला म्हणजेच नक्कीच त्यामागे त्यांच्या काही चांगल्या सवयी आणि जीवनशैली कारणीभूत असेल. चला तर मग जाणून घेऊया.

माध्यमातील वृत्तानुसार वयाची नव्वद वर्ष पूर्ण केल्यानंतर देखील लता दीदी सकाळी सहा वाजता उठत होत्या. त्यांनतर त्यांची तब्येत चांगली राहावी म्हणून त्या कोमट पाणी प्यायचा आणि नाष्टा करायच्या. दुपारच्या जेवणात आहार त्यांचा अगदी साधा आणि घरचा असायचा. दुपारी त्या पोळी, भाजी, आमटी असा आहात घेत असायच्या. तसेच रात्रीच्या जेवणात देखील त्या केवळ आमटी आणि भात खायच्या.

लता दीदींना खाण्याची खूप आवड होती. वेगवेगळे पदार्थ चाखायला त्यांना खूप आवडत असे. परंतु उतरत्या वयानुसार त्याच्या खाण्यावर काही प्रमाणात बंदी आली होती.‌‌ त्यांना गुलाबजाम, दहीवडे, फिशकरी, समोसा, चिकन, जिलबी परंतु वयानुसार त्यांना तेलकट आणि तिखट पदार्थ खाण्यावर डॉक्टरांनी बंदी आणली होती.

त्या नेहमी गाण्याचा रियाज करण्यापूर्वी दही खात असायच्या. घरी असताना देखील त्या दिवसभर बसून नव्हत्या. त्या कोणत्या ना कोणत्या गोष्टीवर इतरांशी चर्चा करत असायच्या.

हेही वाचा :

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा