Monday, May 13, 2024

…म्हणून कॅटरिना कैफने थेट दाबला सलमान खानचा गळा, पाहा संपूर्ण व्हिडिओ

बॉलिवूड इंडस्ट्रीचा भाईजान सलमान खानने त्याच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात छाप पडली. तो नेहमीच त्याच्या चित्रपटात उत्तम कामगिरी करत असतो. सलमान खानसोबत काम करायचं म्हटल तर कोणतीही अभिनेत्री असुद्या नाही हा शब्द येणारच नाही. मात्र, इतर अभिनेत्रींनच सोडलं तर सलमान खान (salman khan) आणि कॅटरिना कैफ (katrina kaif) यांची जोडी त्यांच्या चाहत्यांना फार आवडते.

सलमान खान आणि कॅटरिना कैफ या दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केलं आहे, जिथे त्यांची जबरदस्त केमिस्ट्रीने प्रेक्षकांचे मनं जिंकलेत. सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांच्या संबंधित कोणतीही पोस्ट व्हायरल होते. या परीस्थित स्वतः यशराज फिल्म्सने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर ‘एक था टायगर’ या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यानचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, जो त्यांच्या चाहत्यांना खूप आवडला आहे आणि त्यावर ते आपल्या प्रतिक्रिया सुद्धा देत आहेत. हा व्हिडिओ पोस्ट होताच या व्हिडिओला हजारो लाईक्स मिळाले आहे.

या व्हिडिओमध्ये तुम्ही सलमान खान आणि कॅटरिना कैफ यांचा ‘माशाअल्लाह’ या गाण्याचं शूटिंग पाहू शकता. या व्हिडिओमध्ये कॅटरिना तिच्या या गाण्याच्या डान्सस्टेप कशी करते आणि त्याचवेळी ती तिच्या हसण्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत आहे, हे या व्हिडिओमधून स्पष्ट दिसतंय. तुम्ही बघू शकता की, सुरुवातीला कॅटरिना सलमानसोबत डान्स करते, त्यानंतर सलमान तिच्यापासून लांब जातो आणि म्हणतो, ‘उत्कृष्ट आहे ती.’ या नंतर तो व्हिडिओमध्ये कॅटरिनाची खिल्ली उडवतानाही दिसत आहे, नंतर कॅटरिना कैफ मस्तीमध्ये त्याचा गळा पकडते. दोघांच्या या मजेशीर व्हिडिओवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका युजरने म्हटले की, “या दोघातील केमिस्ट्री पेटली आहे’, त्यावर दुसरा युजर कमेंट करत लिहितो की, बेस्ट एवर कॉम्बिनेशन. सलमान खान आणि कॅटरिनाचा सर्वात लोकप्रिय चित्रपट ‘एक था टायगर’ २०१२ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त व्यवसाय केला. आता लवकरच कॅटरिना आणि सलमान खानचा एकत्र ‘एक था टायगर’ च्या ‘टायगर ३’ फ्रॅंचायझीमध्ये दिसणार आहे.

हेही वाचा :

वडिलांच्या आठवणीत भावुक होऊन गायिका लता मंगेशकर यांनी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर होती केली शेवटची पोस्ट

बाळासाहेब ठाकरे होते प्रत्येक अडचणीत पाठीशी, लता दीदींच्या मनातील खास गोष्ट आली समोर

देशात काय विदेशातही होता लता दीदींच्या आवाजाचा डंका, ‘ही’ पाकिस्तानी अभिनेत्री होती मोठी फॅन

हे देखील वाचा