प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आज त्याचा ४७ वा वाढदिवस साजरा करत आहे. बॉलिवूडचा हॅन्डसम बॉय असलेल्या हृतिकवर सकाळीपासूनच शुभेच्छांचा वर्षावर होत आहे.
हृतिकवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना आता त्यानेच आज वाढदिवसाचे निमित्त साधून चाहत्यांना मोठं गिफ्ट दिलं आहे. त्याने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केल्याने चाहते प्रचंड खुश झाले आहेत.

हृतिकने घोषीत केलेल्या त्याच्या आगामी चित्रपटात त्याच्यासोबत बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादूकोण ही झळकणार आहे. खूप प्रदीर्घ कालावधीच्या प्रतिक्षेनंतर प्रेक्षकांना बॉलिवूडमधील हे सुपरहीट कलाकार पडद्यावर एकसाथ पाहायला मिळणार आहे.
हृतिकच्या या नव्या चित्रपटाचे नाव फाइटर (Fighter) असे आहे. या चित्रपटाबद्दल सांगताना हृतिकने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर लिहिले आहे की, “दीपिकाचा आणि माझा पहिलाच फाइटर हा चित्रपट आहे. त्यासाठी मी उत्सुकही आहे.”