Saturday, April 19, 2025
Home बॉलीवूड खुशखबर! ‘क्रिश’ला १५ वर्षे पूर्ण; खास निमित्ताने व्हिडिओ पोस्ट करत ऋतिक रोशनने केली ‘क्रिश ४’ची घोषणा

खुशखबर! ‘क्रिश’ला १५ वर्षे पूर्ण; खास निमित्ताने व्हिडिओ पोस्ट करत ऋतिक रोशनने केली ‘क्रिश ४’ची घोषणा

लॉकडाऊनमुळे शूटिंग पूर्ण झालेल्या चित्रपटांचे प्रदर्शन लांबणीवर गेले असले, तरीही अशात अनेक मोठमोठ्या चित्रपटांच्या घोषणा होताना दिसत आहे. आगामी काळात प्रेक्षकांना अनेक चांगल्या आणि मोठ्या चित्रपटांची मेजवानी अनुभवायला मिळणार आहे.

ग्रीक गॉड म्हणून ओळखला जाणारा बॉलिवूडचा हँडसम अभिनेता म्हणजे ऋतिक रोशन होय. ऋतिकने त्याच्या करियरमध्ये अनेक मोठे आणि सुपरहिट सिनेमे दिले आहेत. ‘क्रिश’ सिनेमातून ऋतिकने भारताला पहिला सुपरहीरो दिला. ‘क्रिश’ सिनेमानंतर ऋतिक ‘क्रिश ३’ हा याच सिनेमाचा तिसरा भाग घेऊन आला होता. सुपरहीरोवर आधारित असलेले हे सिनेमे सुपरडुपर हिट ठरले. मागील अनेक वर्षांपासून ऋतिकच्या फॅन्सला ‘क्रिश’ सिनेमाच्या चौथ्या भागाची प्रतीक्षा होती.

आता ही प्रतीक्षा संपली आहे. हो, आज (२३ जून) क्रिश चित्रपट प्रदर्शित होऊन १५ वर्ष पूर्ण झाली आहेत. याच दिवसाचे निमित्य साधत ऋतिक रोशनने त्याच्या फॅन्सला मोठे गिफ्ट दिले आहे. त्याने सोशल मीडियावर ‘क्रिश ४’ चित्रपटाची घोषणा केली आहे. त्याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून १५ सेकंदाचा एका व्हिडिओ पोस्ट केला असून त्यात ऋतिक सुपरहीरोच्या अवतारात दिसत आहे.

ऋतिकने अनेकदा ‘क्रिश ४’ चित्रपट लवकर येणार असल्याचे बोलून दाखवले होते. मात्र आज त्याने त्याचे वचन पाळत ‘क्रिश ४’ सिनेमाची घोषणा केली आहे. १५ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी म्हणजेच २३ जून २००६ रोजी, क्रिश सिनेमा प्रदर्शित झाला होता. आता या सीरिजचा चौथा भाग लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

या सीरिजचा पहिला सिनेमा ‘कोई मिल गया’ २००३ रोजी प्रदर्शित झाला होता. राकेश रोशन यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या या सिनेमाने तुफान लोकप्रियता मिळवली. त्यानंतर २००६ मध्ये ‘क्रिश’ आणि २०१३ मध्ये ‘क्रिश ३’ सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सीरिजच्या सर्वच चित्रपटांना रसिकांनी भरभरून प्रेम दिले.

‘कोई मिल गया’ सिनेमाची कथा ‘रोहित मेहरा’ या मुख्य भूमिकेभोवती फिरत होती. त्यानंतर आलेल्या दोन्ही सिनेमाची कथा रोहितचा मुलगा असणाऱ्या कृष्णा भोवती फिरताना दिसली. या सिनेमात मुख्य नायकाला सुपर पॉवर मिळते आणि त्याच्या अनुषंगाने कथा पुढे सरकते. कलाकारांबद्दल सांगायचे झाले, तर ऋतिक रोशनसोबत चित्रपटात प्रियांका चोप्रा जोनास, रेखा, नसरुद्दीन शहा, विवेक ओबेरॉय, कंगना रणौत आदी कलाकार झळकले होते.

साल २०१८ मध्ये राकेश रोशन यांनी जाहीर केले होते की, या सीरिजचा चौथा सिनेमा २०२० च्या नाताळमध्ये प्रदर्शित होईल. पण राकेश रोशन यांच्या आजारपणामुळे हा सिनेमा लांबला. मात्र आता लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘…नैणा ठग लेंगे’, म्हणत प्रार्थना बेहेरेच्या नजरेने केला चाहत्यांच्या हृदयावर वार; ग्लॅमरस फोटो होतायेत व्हायरल

-नववारी साडीमध्ये खुललं अपूर्वा नेमळेकरचं सौंदर्य; तर कॅप्शननेही वेधलं अनेकांचं लक्ष

-स्पृहा जोशीचे लाजने पाहून चुकला चाहत्यांच्या काळजाचा ठोका; व्हिडिओवर पडतोय लाईक्सचा पाऊस

हे देखील वाचा