दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि ऋतिक रोशनला (Hrithik Roshan) चित्रपटात एकत्र पाहण्याची चाहत्यांना नेहमीच इच्छा होती. त्यांचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. गेल्या वर्षी ऋतिक आणि दीपिकाने ‘फायटर’ या चित्रपटाची घोषणा केली होती, ज्यामध्ये दोघेही जबरदस्त ऍक्शन करताना दिसणार आहेत. ‘फायटर’चे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत आहेत. हा चित्रपट यापूर्वी २६ जानेवारी २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता. पण आता तो पुढे ढकलण्यात आला आहे. शाहरुख खानच्या ‘पठाण’सोबतचा संघर्ष वाचवण्यासाठी निर्मात्यांनी ‘फायटर’ची रिलीझ डेट पुढे ढकलली आहे.
शाहरुख खानच्या ‘पठाण’ या कमबॅक चित्रपटाची नुकतीच रिलीझ डेट जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात शाहरुखसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम (John Abraham) मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ‘पठाण’सोबत होणारी स्पर्धा टाळण्यासाठी ‘फायटर’ची रिलीझ डेट बदलण्यात आली आहे. या दोन्ही चित्रपटांचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करत असून, दीपिका पदुकोण या दोन्ही चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
ऋतिकने शेअर केली पोस्ट
‘फायटर’ची रिलीझ डेट बदलण्याची माहिती ऋतिक रोशनने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून दिली आहे. त्याने चित्रपटाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. ज्यामध्ये चित्रपटाच्या स्टारकास्टसह नवीन रिलीझ डेटची घोषणा करण्यात आली आहे. दीपिका आणि ऋतिसोबत अनिल कपूरही (Anil Kapoor) ‘फायटर’मध्ये दिसणार आहेत. पोस्ट शेअर करत त्याने लिहिले, “२८ सप्टेंबर २०२३.”
‘फायटर’बद्दल बोलायचे झाले, तर हा भारतातील पहिला एरियल अॅक्शन फ्लिक चित्रपट असणार आहे. ऋतिक रोशन आणि सिद्धार्थ आनंद तिसऱ्यांदा एकत्र काम करणार आहेत. दोघांनी यापूर्वी ‘वॉर’ आणि ‘बँग-बँग’मध्ये काम केले आहे. चित्रपटाचे शूटिंग जून २०२२ मध्ये सुरू होणार आहे.
दुसरीकडे, ‘पठाण’बद्दल सांगायचे झाले तर शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम हे तिघेही स्पेनमध्ये चित्रपटाचे शूटिंग करत आहेत. नुकतेच तिघेही स्पेनला रवाना झाले आहेत.
दैनिक बोंबाबोंचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा :










