Monday, July 8, 2024

२१ वर्षापूर्वी ‘त्या’ चित्रपटात ‘या’ अभिनेत्याला पाहून मुली अक्षरशः वेड्यापिश्या झालेल्या; लग्नासाठी आली होती ३० हजार स्थळं!

एकवीस वर्षांपूर्वी बॉलीवुड दिग्दर्शक राकेश रोशन यांनी त्यांचा मुलगा हृतिक रोशन ला चित्रपट ‘कहो ना प्यार है’ मधून लॉन्च केलं होतं. हृतिक रोशन चा पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल हिट झाला होता. या चित्रपटाच्या यशानंतर हृतिक रातोरात सुपरस्टार बनला होता.

हृतिक आज वयाची पन्नाशी गाठत असला, तरीही हृतिकसाठी चाहत्यांचे प्रेम अजूनही कमी झालेलं नाहीये. तर मग विचार करा की २१ वर्षांपूर्वी हृतिकला पाहून मुलींची काय अवस्था झाली असेल. त्यावेळी मुली हृतिकच्या प्रेमात इतक्या बुडाल्या होत्या की दररोज हजारो प्रपोजल्स त्याला घरी पत्रांद्वारे येत होते.

Kaho Na Pyar Hai
Kaho Na Pyar Hai

दिनांक १४ जानेवारी रोजी हृतिक रोशन आणि अमिषा पटेल यांच्या ‘कहो ना प्यार है’ या चित्रपटाने २१ वर्षे पूर्ण केली. चित्रपटाने बंपर कमाई तर केली होतीच सोबत गाणीही हिट झाली होती. या चित्रपटाची गाणी अजूनही लोकांच्या जिभेवर आहेत. चित्रपटात हृतिकने दुहेरी भूमिका साकारली आणि त्याने साकारलेल्या दोन्ही भूमिकांवर प्रेक्षकांनी खूप प्रेम केलं. हृतिकच्या रूपाने तेव्हा बॉलिवूडला एक देखणा नायक सापडला.

हृतिकचा चित्रपट पाहिल्यानंतर मुली त्याच्या प्रेमात इतक्या वेड्या झाल्या होत्या की ह्रतिकला लग्नासाठी तब्बल ३०,००० मागण्या आल्या होत्या. परंतु आपल्या हृतिक भावाचं बावरं मन त्यावेळी फक्त सुजैनसाठी धड़कत होतं. त्याने सुजैन खानसोबत २० डिसेंबर २००० रोजी लग्न केलं.

Hritik Roshan
Hritik Roshan

या चित्रपटातून अमीषा पटेललाही ओळख मिळाली. या चित्रपटात तीची आई आशा पटेल यांनी हृतिकची दुसरी भूमिका असलेल्या राजच्या आईची भूमिका साकारली होती. या चित्रपटात हृतिकने उजव्या हाताच्या सहाव्या बोटाला म्हणजेच दुसर्‍या अंगठ्याला लपविण्यासाठी ग्लोव्हज घातले होते. यामुळे, तो चित्रपटामध्ये डावखुरा राहिला आणि डाव्या हाताने त्याने सर्व शॉट्स दिले होते.

या चित्रपटात हृतिक आणि अमिशाची केमिस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली. इतकंच नाही तर या चित्रपटाचं टायटल सॉंग कहो ना प्यार है आणि त्यावरची हृतिकची सिग्नेचर स्टेप अजूनही खूप प्रसिद्ध आहे. हृतिकला या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला होता.

हे देखील वाचा