Saturday, June 29, 2024

Happy chocolate day : ऋतिक रोशनने भरवला दीपिका पदुकोणला चॉकलेट केक, व्हिडिओ होतोय व्हायरल

सध्या सर्वत्र व्हॅलेंटाईन वीक चालू आहे. १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. त्या आधी वेगवेगळे डे साजरे करून प्रेमवीर त्यांचे प्रेम दाखवत असतात. अशातच बुधवारी (९ फेब्रुवारी) रोजी चॉकलेट डे साजरा होत आहे. अनेकजण त्यांच्या प्रियकराला किंवा प्रियसीला चॉकलेट देऊन हा दिवसा साजरा करतात. अशातच बॉलिवूड अभिनेता ऋतिक रोशनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, ऋतिक रोशन आणि दीपिका पदुकोण एकमेकांना चॉकलेट चारताना दिसत आहे. त्यांचा हा गोड व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे. अनेकजण या व्हिडिओवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत.

हा व्हिडिओ ऋतिक रोशनच्या एका फॅन पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. त्यांचा हा व्हिडिओ दोन वर्ष जुना आहे. हा व्हिडिओ रोहिणी अय्यरच्या हाऊस पार्टीमधील आहे. ज्यात ऋतिक रोशन आणि दीपिका पदुकोणसोबत अनेक बॉलिवूड कलाकार सामील झाले होते. या व्हिडिओमध्ये ऋतिक दीपिकाला केक भरवताना देखील दिसत आहे. यावेळी मागून आवाज येत आहे की, ऋतिक आणि दीपिका एकत्र किती क्यूट दिसत आहेत. (Hrithik Roshan feeding Deepika Padukone chocolate cake, video viral)

ऋतिक आणि दीपिकाची जोडी सगळ्यांना खूप आवडते. ते दोघेही आपल्याला या आधी ‘फायटर’ या चित्रपटात दिसले आहे. त्यांच्या जोडीला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले होते. तसेच त्यांचे चाहते आगामी काळात त्यांना एकत्र चित्रपटात बघण्याची इच्छा व्यक्त करत आहेत.

हेही वाचा :

हे देखील वाचा