Thursday, March 28, 2024

अरुणिता कांजीलालने लावली पवनदीप राजनच्या बहिणीच्या लग्नाला हजेरी, व्हिडिओमध्ये पवनदीप देखील झाला स्पॉट

टीव्हीवरील सिंगिंग रियॅलिटी शो ‘इंडियन आयडलचा १२’वा सीझन चांगलाच हिट ठरला आहे. ‘इंडियन आयडल १२’ विजेता पवनदीप राजनची बहीण चांदनी राजनच्या बहिणीचे उत्तराखंडमधील उत्तराखंडमध्ये झाले. पवनदीपच्या बहिणीच्या हळदी समारंभाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये अरुणिता कांजीलालही दिसत आहे. यावरून या लग्नसोहळ्यात अरुणिताही सहभागी झाल्याचे स्पष्ट होते. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये अरुणिता (Arunita Kanjilal) पवनदीपची (Pawandeep Rajan) बहीण चांदनीला हळदी लावताना दिसत आहे. यावेळी तिने सूट घातला असून, पवनदीपने कुर्ता पायजमासोबत काळा चष्मा घातला आहे. ‘इंडियन आयडॉल १२’ मधील स्पर्धकांच्या गाण्याव्यतिरिक्त पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल यांची जोडी चर्चेत होती.

दोघांच्या मैत्रीचे चाहत्यांनी कौतुक देखील केले आणि यामुळेच चाहत्यांनी पवनदीपला शोचा विजेता बनवले. तर अरुणिता या शोची फर्स्ट रनर अप ठरली. शो संपल्यानंतर पवनदीप आणि अरुणिताची केमिस्ट्री एका गाण्याच्या रुपात समोर आली. जेव्हा पवनदीप आणि अरुणिताचे पहिले रोमँटिक गाणे ‘मंजूर दिल’ प्रदर्शित झाले तेव्हा प्रेक्षकांनी या गाण्यावर भरभरून प्रेमाचा वर्षाव केला.

‘इंडियन आयडल १२’ च्या दरम्यान, पवनदीप राजन आणि अरुणिता कांजीलाल यांच्या जोडीबद्दल चर्चा होती की, दोघांमध्ये काहीतरी सुरू आहे. मात्र, दोघांनीही ही बातमी पूर्णपणे अफवा असल्याचे म्हटले होते. पवनदीप आणि अरुणिता यांनी अनेक मुलाखतींमध्ये हे स्पष्ट केले आहे की, दोघेही फक्त चांगले मित्र आहेत. पण दोघांची जोडी कायमची असावी अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे.

अरुणिता आणि पवनदीप यांच्याबद्दल चाहत्यांमध्ये असलेली क्रेझ कोणापासूनही लपलेली नाही. इंडियन आयडलमध्ये दोघांचा लव्ह अँगल दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. जरी दोघांमध्ये लव्ह ट्रॅक नव्हता. ते चांगले मित्र होते. दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना एवढी आवडली की, ते एकमेकांना जोडू लागले. शो संपल्यानंतर अरुणिता आणि पवनदीप यांनी अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये एकत्र काम केले आहे. दोघेही एकत्र कार्यक्रम करतात.

हेही वाचा :

हे देखील वाचा