Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘विक्रम वेधा’चे जबरदस्त पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला; बहुप्रतिक्षित ट्रेलर लाँचची तारीखही घोषित

या हंगामातील बहुप्रतिक्षित ‘विक्रम वेधा‘ हा चित्रपट टिझर लाँच झाल्यापासून लक्ष वेधून घेत आहे. उत्कंठावर्धक टिझरने प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबाबत कुतूहल जागविले आहे. प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असतानाच मेकर्सनी या चित्रपटाचे नवे पोस्टर प्रदर्शित केले आहे. यामध्ये सिनेमातील दोन्ही कलाकार आजवर कधीही न पाहिलेल्या रुपात दिसत आहेत, त्यामुळे ‘विक्रम वेधा’चे निर्माते चित्रपटाचा ट्रेलर कधी रिलीज करणार? याची चाहत्यांना प्रतीक्षा होती. या चित्रपटाचा ट्रेलर गुरुवारी (दि. 08 सप्टेंबर) रोजी सिनेप्रेमींच्या भेटीला येणार आहे.

पुष्कर आणि गायत्री (Pushkar And Gayathri) यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या ‘विक्रम वेधा’ (Vikram Vedha) सिनेमाचे नवे पोस्टर या सिनेमाबाबतचे कुतूहल वाढवणारे आहे. पोस्टरमध्ये पहिल्यांदाच ऋतिक रोशन (Hrithik Roshan) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांना एकाच फ्रेममध्ये एकत्र पाहणं प्रेक्षकांसाठी एखाद्या जादूपेक्षा कमी नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hrithik Roshan (@hrithikroshan)

या सिनेमात भरपूर ऍक्शन पाहायला मिळणार असल्याचे पोस्टरवरून जाणवते. पोस्टरवर गन हातात घेतलेला ऋतिक स्लायडिंग पोजिशनमध्ये आणि दुसरीकडे पोलिसी रुपात किलिंग एक्सप्रेशन्स देत शूटिंग पोजिशनमध्ये सैफ दिसतो. पोस्टरवर ट्रेलरची रिलीज डेटही घोषित करण्यात आली आहे, ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत, त्यामुळे नवे पोस्टर लक्षवेधी असून ऋतिक आणि सैफ यांच्या चाहत्यांच्या मनात उत्साह वाढवणारे आहे.

‘विक्रम वेधा’ची प्रस्तुती गुलशन कुमार, टी-सीरिज आणि रिलायन्स एंटरटेनमेंट यांच्या सहयोगाने फ्रायडे फिल्मवर्क, जिओ स्टुडिओज आणि वायनॉट स्टुडिओज प्रोडक्शनने केली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन पुष्कर आणि गायत्री यांनी केले असून, भूषण कुमार, एस. शशिकांत आणि रिलायन्स एंटरटेनमेंट यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. ‘विक्रम वेधा’ हा चित्रपट 30 सप्टेंबर रोजी संपूर्ण जगभर रिलीज होणार आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
या 10 अभिनेत्रींनी दाखवून दिले वय म्हणजे फक्त आकडा, आजही गाजवतायेत ओटीटी प्लॅटफॉर्म
स्ट्रगलच्या दिवसात नोरा फतेहीने श्रद्धा कपूरला शिकवला आहे डान्स, वाचा त्यांचा किस्सा
टेलिव्हिजनपासून ते बॉलिवूडपर्यंत लोकप्रिय आहे डेलनाझ इराणी, असे आहे वैयक्तिक आयुष्य

हे देखील वाचा