बॉलिवूडमध्ये असे बरेच अभिनेते आहेत, ज्यांना त्यांच्या शांत आणि कूल स्वभावासाठी ओळखले जाते. परंतु काहीवेळी अशी परिस्थिती निर्माण होते की, त्यांना आपला राग अनावर होतो. सुपरस्टार ऋतिक रोशन याचाही समावेश शांत स्वभाव असणाऱ्या अभिनेत्यांमध्ये होतो. परंतु नुकताच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, त्यामध्ये रुग्णालयातील एका मुलाने ऋतिकशी गैरवर्तन केले. त्यानंतर ऋतिकने त्या मुलाचा चांगलाच समाचार घेतला.
झाले असे की, ऋतिक रोशन आपल्या दोन्ही मुलांसोबत कामानिमित्त एका रुग्णालयात गेला होता. तिथे मेन गेटवर उभा असलेल्या मुलाने ऋतिकशी गैरवर्तन केले आणि त्याला आत जाण्यापासून रोखले. तो मुलगा खूपच वाईट पद्धतीने बोलत होता. यानंतर ऋतिकचा राग अनावर झाला आणि त्याने त्या मुलाला चांगलेच खडसावले.
तो म्हणाला की, “अरे मग असं सांग ना” असे बोलून ऋतिक आपल्या मुलांसोबत रुग्णालयाच्या दुसऱ्या दरवाज्याच्या दिशेने मार्गस्थ झाला. यादरम्यानचा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ शेअर करताच यावर चाहत्यांनी कमेंट्स करण्यास सुरुवात केली.
खरं तर यापूर्वी ऋतिक रोशन सुझेन खानच्या कुटुंबासोबत पिकनिकचा आनंद घेताना दिसला होता. ऋतिकने स्वत: या ट्रीपचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर केले होते. या फोटोंंमध्ये ऋतिकसोबत त्याची माजी पत्नी सुझेन खानचा भाऊ झायेद खान आणि त्याचे कुटुंबही दिसत आहे.
सुझेन खान आणि ऋतिक रोशन यांच्यात चांगले संबंध आहेत. नुकतेच सुझेनने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये सुझेन आपल्या इंटिरियरचे काम करताना दिसत आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, “जेव्हा ग्लेडिएटर्स काम हे खेळाप्रमाणे वाटते.” या व्हिडिओवर सुझेनची प्रशंसा करत ऋतिकने कमेंट केली की, “अमेझिंग.”
ऋतिकच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर तो सध्या आपल्या आगामी ‘फायटर’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत मुख्य भूमिकेत दीपिका पदुकोण दिसणार आहे. ‘फायटर’ या सिनेमाची घोषणा ऋतिकने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी केली होती. दुसरीकडे दीपिकानेही चित्रपटाचा टिझर शेअर करत लिहिले होते की, “स्वप्ने खरोखरच खरी ठरतात.”
‘फायटर’ हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच सप्टेंबर २०२२ मध्ये रिलीझ होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद करणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
एका जाहीरातीमुळे बदलली ‘तिची’ जिंदगी! थेट मिळाली ऋतिक रोशनबरोबर काम करण्याची संधी
बॉलिवूड सुपरस्टार अनिल कपूरने शर्टलेस फोटो केले शेअर; बॉडी पाहून ऋतिक- रितेशही झाले फिदा
सेलिब्रेटींना लग्नाच्या खर्चापेक्षा महागडा ठरला घटस्फोट, पोटगीपोटी मोजावे लागले करोडो रुपये