हिंदी आणि मराठी चित्रपट जगतात सध्या अनेक अभिनेते आणि अभिनेत्री त्यांचे बालपणीचे फोटो शेअर करत आहेत. जे त्यांच्या चाहत्यांनी ओळणे कठीण होत असते. अनेक अभिनेत्रींचे असे बालपणीचे गोंडस फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. याआधी ‘चला हवा येऊ द्या’ फेम श्रेया बुगडेचाही (Shreya Bugde) असाच एक फोटो व्हायरल झाला होता. आताही आणखी एका मराठी अभिनेत्रीचा क्युट फोटो व्हायरल होत आहे. कोण आहे ही अभिनेत्री चला जाणून घेऊ.
याबाबत संपूर्ण माहिती अशी की, मराठी चित्रपट जगतातील अनेक अभिनेत्री त्यांच्या बालपणीचे फोटो आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर करत असतात.सध्या प्रसिद्ध अभिनेत्री ऋता दुर्गुळेचाही (hruta durgule) असाच एक फोटो समोर आला आहे. जो तिने स्वतः आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन पोस्ट केला आहे. या फोटोमध्ये बालपणीची गोड ऋता आपल्या बहिणीसोबत खेळताना दिसत आहे.
‘सिबलिंग डे’ चा हॅशटॅग वापरत आपल्या इंंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या ह्रुताच्या या फोटोला तिचे चाहते जोरदार प्रतिक्रिया देत आहेत. तसेच तिच्या या फोटोमधील लूकचे कौतुकही करत आहेत. अनेकांनी ह्रताच्या या फोटोवर लहानपणीपण इतकी गोड दिसत होतीस का म्हणत तिचे कौतुक केले आहे. सध्या ऋताचा हा फोटो सर्वत्र व्हायरल होत आहे.
दरम्यान अभिनेत्री ऋता दुर्गुळेही मराठी मालिका क्षेत्रातील एक यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि सोज्वळ सौंदर्याने तिने मनोरंजन क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. ह्रताने स्टार प्रवाहवरील ‘दूर्वा’ मालिकेमधून छोट्या पडद्यावर एंट्री केली होती. या मालिकेने ह्रुताला घराघरात लोकप्रियता मिळवून दिली होती. मालिकेतील तिच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले होते. या मालिकेच्या यशानंतर ऋताला कधीही मागे वळून पाहावे लागले नाही.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
- हेही वाचा-
- सलमान खानच्या ‘या’ अभिनेत्रीचा बदललाय पूर्ण अंदाज, चित्रपटसृष्टी सोडून पतीसोबत कॅनडामध्ये थाटलाय संसार
- अमिताभ बच्चन यांनी कायदेशीर नोटीस पाठवूनही कंपनी का दाखवतेय पान मसाल्याची जाहिरात? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
- रोहिणी हट्टंगडी यांनी ‘या’ ६ बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करून मिळवली खास ओळख, पाहा त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांची यादी