काय सांगता! श्रेया बुगडेने घेतलाय ‘चला हवा येऊ द्या’ मधून ब्रेक? काय आहे सत्य?

महाराष्ट्राच्या तमाम प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारा कार्यक्रम म्हणून ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाची नेहमीच चर्चा होत असते. लेखक निलेश साबळे (Nilesh Sabale) आणि त्याच्या टीमने या कार्यक्रमाच्या माध्यमातून जणू महाराष्ट्राला हसवण्याचा विडाच उचलला आहे. या कार्यक्रमाची टीम म्हणजे भाऊ कदम (Bhau Kadam), भारत गणेशपुरे (Bharat Ganeshpure), सागर कारंडे (sagar Karande), श्रेया बुगडे (Shreya Bugde) आणि कुशल बद्रिके (Kushal Badrike) यांच्या अभिनयाची नेहमीच चर्चा होताना दिसत असते. मात्र सध्या या कार्यक्रमाची प्रमुख कलाकार श्रेया बुगडे पर्यटनाचा आनंद लुटताना दिसत आहे, त्यामुळे तिने या कार्यक्रमातून ब्रेक घेतला आहे ही काय अशी चर्चा सुरू झाली आहे.

‘चला हवा येऊ द्या’ कार्यक्रमातील प्रत्येक चेहरा संपुर्ण महाराष्ट्राच्या ओळखीचा आहे. मात्र या सगळ्या पुरूष कलाकारांच्या गर्दीतही अभिनेत्री श्रेया बुगडेने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या कसदार अभिनयाने ती महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात पोहोचली आहे. श्रेयाच्या अभिनयाचे आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याचे नेहमीच कौतुक होताना दिसत असते.

View this post on Instagram

A post shared by Shreya Bugde Sheth???? (@shreyabugde)

सध्या या कार्यक्रमाची टीम सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी अभिनेता कुशल बद्रिके त्याच्या कुटुंबासोबत फिरताना दिसला होता. तर अभिनेते भाऊ कदमही आपल्या फॅमिलीसोबत फिरायला गेलेले दिसले होते. आता अभिनेत्री श्रेयाही आपल्या मैत्रिणींसोबत विविध ठिकाणी फिरताना दिसत आहे. त्यामुळे तिने या कार्यक्रमातून ब्रेक घेतला की काय अशी चर्चा रंगली आहे. मात्र याबद्दलची माहिती समोर आली असून श्रेयाने आधीच तिचे शूटिंग पुर्ण केल्याने ती सध्या सुट्ट्यांचा आनंद घेत असल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यामुळे श्रेया बुगडे सध्या दुबईवारीला गेली आहे. या सहलीचे तिचे फोटो सध्या सगळीकडे व्हायरल होत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Shreya Bugde Sheth???? (@shreyabugde)

दरम्यान कार्यक्रमात श्रेया बुगडेच्या विनोदी शैलीचे अफलातून कॉमेडीचे नेहमीच कौतुक होत असते. मूळची पुण्याची असलेल्या श्रेयाने बालपणापासूनच अभिनयाला सुरूवात केली होती. श्रेया तिच्या अभिनयाइतकीच सोशल मीडिया पोस्टमुळेही नेहमी चर्चेत असते. ती नेहमीच तिचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. सोशल मीडियावर श्रेयाचा मोठा चाहतावर्ग आहे. जे  तिच्या प्रत्येक पोस्टला जोरदार प्रतिसाद देत असतात.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा – 

Latest Post