Monday, July 8, 2024

आनंद गगनात मावेना! तब्बल ‘इतके’ फॉलोव्हर्स पूर्ण झाल्याच्या आनंदात ऋताने शेअर केली खास पोस्ट

आजचे युग हे डिजिटल युग मानले जाते. सर्वकाही ऑनलाइन चालू असतं. अशामध्ये आपण सर्वजण आपल्या दैनंदिन जीवनात सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करतो. कलाकारही याला अपवाद नाहीत. आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी कलाकार मंडळी सोशल मीडियावर सक्रिय राहतात. तर आपल्या आवडत्या कलाकारांविषयी जाणून घेण्यासाठी चाहते त्यांना वेगवेगळ्या सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवरून फॉलो करत असतात. शिवाय आपल्या फॉलोव्हर्सच्या संख्येत वाढ झाली की, कलाकारांचा आनंद गगनात मावेनासा होतो. कारण यावरून त्यांना लक्षात येतं की, कोणाचा चाहतावर्ग किती आहे.

सध्या असंच काहीसं मराठमोळी लाडकी अभिनेत्री ऋता दुर्गुळेसोबत घडलं आहे. महाराष्ट्राची लाडकी क्रश म्हणून ओळखली जाणारी ऋता दुर्गुळे अनेकदा तिचे दिलखेचक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. शिवाय आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती देत, ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. तिचे मनाला भुरळ पाडणारे फोटो बऱ्याचदा सोशल मीडियावर व्हायरलही होतात, ज्याला चाहते भरभरून प्रेम देतात. (hruta durgule completed 2.3 m followers on instagram)

आता अभिनेत्रीचा चाहतावर्ग सुमारे २.३ दशलक्ष झाला आहे. यामुळे ती खूपच खुश झाली आहे. चाहत्यांसोबत हा आनंद शेअर करत, तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट देखील शेअर केली आहे. ऋताने सोशल मीडियावर तिचा एक सुंदर फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये तिने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. ज्याची निळी आणि पिवळी ओढणी हवेत उडवताना, अभिनेत्रीच्या चेहऱ्यावरील आनंद आपण सहज पाहू शकतो.

हा फोटो शेअर करत, तिने तिच्या चाहत्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “हॅपी २.३ दशलक्ष…तुमच्या प्रेम आणि पाठिंब्यासाठी खूप खूप धन्यवाद. मी तुमची कृतज्ञ राहील.” ही पोस्ट आला सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरत आहे. चाहते तिला कमेंट्सच्या माध्यमातून शुभेच्छा देत आहेत. तर आतापर्यंत या पोस्टवर १ लाख, ८९ हजाराहून अधिक लाईक्स आले आहेत.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भयावह! बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांना आलाय खऱ्या भूतांचा अनुभव, ऐकून तुमचाही उडेल थरकाप

-Bigg Boss 15: यावेळी जंगल थीमवर बनलंय ‘बिग बॉस’चं घर, फोटो पाहून तुम्हीही कराल कौतुक

-मैत्रिणींसह भटकंतीला निघाली जान्हवी कपूर, निसर्गाच्या सानिध्यात घालवतेय वेळ

हे देखील वाचा