Tuesday, July 9, 2024

‘मन उडू उडू झालं!’ ऋता दुर्गुळेच्या गोड स्मितवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

‘फुलपाखरू’ मालिकेत काम करून अभिनेत्री ऋता दुर्गुळे घरघरात पोहचली. अगदी कमी कालावधीत ती महाराष्ट्राची ‘क्रश’ बनली आहे, असे म्हणणे कदाचित चुकीचे ठरणार नाही. या दिवसांत ती सोशल मीडियावर सक्रिय राहून चाहत्यांच्या संपर्कात असते. तिचे निरागसतेने भरलेले फोटो नेहमीच चाहत्यांना भुरळ पाडतात. आता अभिनेत्रीचा एक फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

नुकताच ऋताने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यात तिची अप्रतिम सुंदरता पाहायला मिळत आहे. हा फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला असून, याला चाहत्यांचे भरभरून प्रेम मिळत आहे. या फोटोमधील ऋताचा सोज्वळ अंदाज चाहत्यांना भुरळ पाडायला पुरेसा आहे. या तुम्ही पाहू शकता की, अभिनेत्रीने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे आणि त्यावर ओढणी घेतली आहे. कपाळावरचं कुंकू आणि ओठांवरची गोड स्माईल चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवतेय. (hruta durgule shared her cute photo on instagram)

ऋताचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच पसंत केला जात आहे. फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये ‘जस्ट’ लिहिलं आहे. चाहते या फोटोवर भरभरून प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. शेअर केल्यापासून आतापर्यंत या फोटोवर तब्बल १ लाख, ६३ हजाराहून अधिक लाईक्स आले आहेत.

ऋताच्या कामाबद्दल बोलायचे झाले, तर तिने ‘दुर्वा’ आणि ‘फुलपाखरू’ या मालिकांमध्ये काम करून चाहत्यांची मने जिंकली आहेत. ती ‘सिंगिंग स्टार’ या रियालिटी शोमध्ये झळकली आहे. शिवाय तिने ‘स्ट्रॉबेरी शेक’ या शॉर्टफिल्ममध्येही काम केले आहे. विशेष म्हणजे आता अभिनेत्री रवी जाधवच्या ‘टाईमपास ३’ मध्ये झळकणार आहे. आता अभिनेत्री झी मराठीच्या ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेत झळकत आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बॉलिवूडला ‘राम राम’ ठोकल्यानंतर, ‘दंगल गर्ल’ झायरा वसीमने प्रथमच शेअर केला तिचा फोटो

-शूटिंगच्या पहिल्याच दिवशी संजय मिश्रा यांनी दिले होते २८ टेक, अखेर कंटाळून दिग्दर्शकाने केलं ‘हे’ काम

-‘कसं काय पावनं बरं हाय का?’ मृण्मयीने शेअर केला आदिनाथसोबतचा दिलखेचक फोटो

हे देखील वाचा