Wednesday, July 2, 2025
Home मराठी ‘ती रिऍक्शन, जेव्हा लग्नात कोणीतरी म्हणतं की…’, ऋता दुर्गुळेने शेअर केलेल्या लेटेस्ट फोटोवर रंगल्यात चर्चा

‘ती रिऍक्शन, जेव्हा लग्नात कोणीतरी म्हणतं की…’, ऋता दुर्गुळेने शेअर केलेल्या लेटेस्ट फोटोवर रंगल्यात चर्चा

महाराष्ट्राची लाडकी ‘क्रश’ म्हणून ओळखली जाणारी ऋता दुर्गुळे अनेकदा तिचे दिलखेचक फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. शिवाय आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती देत, ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. तिचे मनाला भुरळ पाडणारे फोटो बऱ्याचदा सोशल मीडियावर व्हायरलही होतात, ज्याला चाहते भरभरून प्रेम देतात.

ऋताने नुकताच एक मजेशीर फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो चाहत्यांमध्ये चांगलाच पसंत केला जात आहे. इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या या फोटोमध्ये ऋता टेबलजवळ एका खुर्चीवर बसलेली दिसत आहे. या फोटोची मजेशीर बाब म्हणजे याचे कॅप्शन.

फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, ऋताने अतिशय मजेदार असे एक्सप्रेशन्स दिले आहेत. फोटो शेअर करत सोबतच तिने लिहिलं आहे की, “ती रिऍक्शन…जेव्हा लग्नात कोणीतरी म्हणतं की, ‘आता पुढचा नंबर तुझा आहे!!!’…” हा फोटो पाहून चाहते देखील यावर मजेदार कमेंट्स करत आहेत. कोणी तिच्या सुंदरतेचं कौतुक केलं आहे, तर कोणी तिचं सेन्स ऑफ ह्युमर पाहून ‘वाह’ करत आहे. (hruta durgule shared photo and said that reaction when someone in wedding)

ऋताने ‘फुलपाखरू’मध्ये वैदेहीची भूमिका साकारून अवघ्या प्रेक्षक वर्गाला भांबावून सोडलं होतं. तेव्हा पासूनच चाहते तिच्या प्रेमात आहेत. आता रवी जाधवच्या ‘टाईमपास ३’ द्वारे ऋता रुपेरी पडद्यावर एन्ट्री मारणार आहे. टाईमपासच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं. आता तिसऱ्या भागात ऋताला पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये बरीच उत्सुकता लागली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘यार गजब आहेस तू’, श्रुती मराठेच्या ग्लॅमरस फोटोंवर चाहत्याची झक्कास कमेंट

-अभिनेत्री शगुफ्ता अलीच्या मदतीसाठी धावला जॉनी लिव्हर; आर्थिक खर्च भागवण्यासाठी विकल्यात घरातील वस्तू

-तापसी पन्नूच्या लग्नासाठी आई- वडील चिंतेत; म्हणाले, ‘आता कोणाशीही लग्न कर…’

हे देखील वाचा