Monday, June 24, 2024

‘हम दो हमारे दो’ सिनेमामुळे प्रेक्षकांची ही दिवाळी ठरणार ‘फॅमिलीवाली’

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री कृती सेनन यांच्या आगामी ‘हम दो हमारे दो’ चित्रपटाचा अतिशय मजेदार आणि हटके टिझर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी आणि कृतीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून हा टिझर प्रदर्शित केला आहे. हा टिझर पाहूनच चित्रपटाबद्दल असणारी उत्सुकता खूपच वाढली आहे.

राजकुमार आणि कृती यांना लग्न करायचे आहे, मात्र त्याआधी त्यांना त्यांच्या आई-वडिलांना दत्तक घ्यायचे आहे. ही कल्पना ऐकूनच तुम्हाला विचित्र, आश्चर्य वाटले पण हेच संवाद कृतीच्या तोंडून या टीझरमध्ये ऐकायला मिळत आहे. या टीझरची सुरुवात राजकुमार रावच्या ‘स्त्री’ सिनेमाच्या झलकपासून होते, पुढे कृतीचा ‘लुका छुपी’, नंतर ‘बाला’ आणि अखेर कृतीच्या ‘मिमी’ची झलक दिसते. मग सुरू होतो, ‘हम दो हमारे दो’चा टिझर कृती राजकुमारला सांगते की, ‘तू तुझ्या आई-वडिलांना घरी भेटायला घेऊन ये.”

या टीझरमध्ये राजकुमार हा एका गावातला दिसत असून, कृती शहरात राहणारी मॉडर्न मुलगी दिसत आहे. टीझरच्या बॅकग्राऊंडला दिग्गज अभिनेते परेश रावल यांचा आवाज ऐकू येत आहे. कृती आणि राजकुमार टीझरमध्ये त्यांच्या आई-वडिलांना दत्तक घेण्याबाबत बोलताना दिसतात. राजकुमार गावातल्या चौकात मुलांना घेऊन बसलेला दिसत असतानाच कृती मोडेन कपड्यांमध्ये त्याच्याजवळ येत आई-बाबांना दत्तक घ्यायचे म्हणते आणि राजकुमाराच्या चेहऱ्यावर विचित्र हावभाव येतात.

काही सेकंदांचा हा टिझर पाहून प्रेक्षक आता उत्सुकतेने सिनेमा प्रदर्शित होण्याची वाट बघत आहेत. अतिशय वेगळा आणि पठडीबाहेर विषय या सिनेमात हलक्याफुलक्या पद्धतीने दाखवला जाणार असून, सिनेमा बघताना प्रेक्षक नक्कीच पोट धरून धरून हसणार हे टीझरवरूनच लक्षात येत आहे.

दिनेश विजान यांच्या मॅकडॉक फिल्म्स या प्रोडक्शन हाऊसमध्ये तयार होणारा ‘हम दो हमारे दो’ चित्रपट येत्या दिवाळीमध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. २९ ऑक्टोबर रोजी सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जाणार आहे. कृतीने हा टिझर शेअर करताना लिहिले, “ये दिवाली फॅमिलीवाली सादर करत आहोत हम दो हमारे दो का टिझर. लवकरच हॉटस्टारवर स्ट्रीमिंग होईल.”

‘हम दो हमारे दो’ या सिनेमात कृती आणि राजकुमार रावसोबत परेश रावल, अपारशक्ति खुराना, रत्ना पाठक आदी आकलर महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. टीजरमध्ये एक प्रश्न देखील विचारला आहे, “आता आपला हिरो काय करणार?” या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिषेक जैन यांनी केले असून, लवकरच याचा ट्रेलर प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

बऱ्याच काळापासून गायब असणारा इंडियन आयडलचा पहिला विजेता अभिजीत सावंत आहे तरी कुठे?

फॅशन वीकमध्ये जलवे दाखवल्यावर पॅरिसच्या रस्त्यांवर अभिषेक, आराध्यासोबत फिरताना दिसली ऐश्वर्या राय

रणबीरच्या ‘ॲनिमल’ चित्रपटाचे शूटिंग पुढच्या वर्षी होणार सुरु, ‘या’ भूमिकेत दिसणार लव्हर बॉय

हे देखील वाचा