असे अनेक बॉलिवूड चित्रपट आहेत, ज्यात बालकलाकारांनी चित्रपटात जीव ओतून पात्र साकारली आहेत. चित्रपट पूर्ण करण्यासोबतच या बालकलाकारांनी प्रेक्षकांच्या हृदयातही आपले खास स्थान निर्माण केले आहे. अनेक वर्षांनंतरही चाहते ना त्यांचा चेहरा विसरतात, ना त्यांचे पात्र. त्याचबरोबर चित्रपटात बालकलाकारांची भूमिका साकारून प्रसिध्दीच्या झोतात आले. प्रेक्षकांनी देखील त्यांच्या भूमिकेचे आणि टॅलेंटचे कौतुक केले. मात्र, काही बालकलाकार त्यांचे टॅलेंट घेऊन मनोरंजन विश्वात पुढे जातात, तर काही अचानक मनोरंजन विश्वातील गायब होतात. बालकलाकारांनी आपले टॅलेंट आणि निरागसता दाखवत चित्रपटांमध्ये भूमिका चोख भूमिका साकारल्या आहेत.
जवळपास २१ वर्ष जुना चित्रपट ‘हम साथ साथ है’ हा आजही प्रेक्षकांच्या आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटातील प्रत्येक पात्राने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आजही या चित्रपटातील डायलॉग आणि कलाकार लक्षात राहतात. त्याचबरोबर या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका साकारणारी झोया अफरोज मोठी झाली आहे. तिचा जबरदस्त लूक पाहून तुम्हीही तिच्या प्रेमात पडाल.
झोयाचा बदलला आहे पूर्ण लूक
चित्रपटातील सर्वात लोकप्रिय चित्रपट ‘हम साथ साथ है’मध्ये झोया अफरोज (Zoya Afroz) नीलम कोठारीच्या धाकट्या मुलीच्या भूमिकेत दिसली होती. ती आता मोठी झाली आहे. झोया अफरोजचे नवीन फोटो पाहून चाहत्यांना त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही की, ही तीच मुलगी आहे. झोया अफरोज एक सुपरमॉडेल आणि अभिनेत्री आहे. झोयाचे ग्लॅमरस फोटो पाहून चाहत्यांचे भान हरपले आहेत.
झोयाने मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये केले आहे काम
झोया लखनऊची रहिवासी आहे. मिठीबाई कॉलेजमधून तिने शिक्षण पूर्ण केले. झोयाने अनेक सौंदर्य स्पर्धांमध्येही भाग घेतला आहे. झोया पॉन्ड्स फेमिना मिस इंडियाची दुसरी रनरअप होती. चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर झोयाने ‘हम साथ साथ हैं’व्यतिरिक्त ‘कहो ना कहो’, ‘प्यार के साथ तिया से’, ‘ये बेनकाब’, ‘स्वीटी वेड्स एनआरआय’ यांसारख्या अनेक मोठ्या प्रोजेक्ट्समध्ये काम केले आहे.
हेही वाचा-