Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

राजकुमार अन् पत्रलेखाच्या मेहंदी सोहळ्यात पोहोचली हुमा कुरेशी, जोडपे आज अडकेल रेशीमगाठीत

बॉलिवूड अभिनेता राजकुमार राव त्याची गर्लफ्रेंड पत्रलेखासोबतच्या लग्नाच्या बातम्यांमुळे सतत चर्चेत असतो. माध्यमांतील वृत्तानुसार, हे कपल १४ नोव्हेंबरला लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. दोन्ही कुटुंबे लग्नाच्या तयारीत व्यस्त आहेत. राजकुमार आणि पत्रलेखा यांचे लग्न चंदीगडमध्ये होणार आहे. लग्नात सहभागी होण्यासाठी कुटुंबीय आणि काही खास मित्रमंडळी पोहोचली आहेत. बाकीचे पाहुणे लग्नाच्या दिवशीच कार्यक्रमस्थळी पोहोचतील असे मानले जात आहे. मात्र पत्रलेखाची बेस्ट फ्रेंड आणि बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी आधीच पोहोचली.

शनिवारी (१३ नोव्हेंबर) पत्रलेखाचा मेहंदी सोहळा झाला. या खास सोहळ्यात कुटुंबासोबतच मित्रमंडळीही सहभागी झाले. अभिनेत्री हुमा कुरेशीही पत्रलेखाच्या आयुष्यातील या खास प्रसंगाचा एक भाग होण्यासाठी पोहोचली. माध्यमांतील वृत्तानुसार, हुमा दोन दिवसांपूर्वीच तिच्या मैत्रिणीच्या लग्नाच्या कार्यक्रमात पोहोचली होती. ती बायरोड आपल्या कारमधून दिल्लीहून चंदीगडला गेली. हुमा आणि पत्रलेखा या चांगल्या मैत्रिणी आहेत. अशा परिस्थितीत हुमाला तिच्या मैत्रिणीच्या आयुष्यातील सुखद प्रवासाच्या प्रत्येक खास प्रसंगी उपस्थित राहायचे आहे.

राजकुमार राव आणि पत्रलेखा गेल्या ७ वर्षांच्या नात्याला एक सुंदर नाव द्यायला चालले आहेत. राजकुमारने आपल्या नात्याबद्दल कधीही काहीही सांगितले नसले, तरी एकदा करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये सांगितले होते की, “पत्रलेखा खूप मोकळ्या मनाची आहे. आम्ही दोघे चांगले मित्र आहोत. मला वाटते की, तुमचा जोडीदार तुमचा सर्वात चांगला मित्र असतो तेव्हा खूप छान वाटते. तुम्ही त्याच्यासोबत वेळ घालवू शकता, डान्स करू शकता, चित्रपट पाहू शकता.”

माध्यमांतील वृत्तानुसार, १४ नोव्हेंबरला राजकुमार राव आणि पत्रलेखाचे लग्न आहे. तर १३ नोव्हेंबरला मेहंदी सोहळा झाला. तीन दिवस चालणाऱ्या या विवाह सोहळ्यात रविवारी विवाहानंतर सोमवारी विवाहोत्तर सोहळा होणार आहे. हुमा कुरेशी व्यतिरिक्त चित्रपट दिग्दर्शक हंसल मेहता यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार यात सहभागी होणार आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सुर्याचा दमदार ड्रामा चित्रपट आहे ‘जय भीम’, पाहण्यापूर्वी वाचा रिव्ह्यू

-‘जय भीम’ चित्रपटातील ‘त्या’ सीनवर प्रकाश राज यांचे प्रत्युत्तर; म्हणाले, ‘लोकांना आदिवासींचे हाल दिसले नाहीत’

-वडिलांची परवानगी मिळाली असती, तर सलमान असता जुहीचा पती; लग्नासाठी हात मागायलाही गेला होता, पण…

हे देखील वाचा