Saturday, June 29, 2024

फाटलेल्या दुधात आणि केशरी बासुंदीत फरक राहणारच! ‘या’ सीक्वेल चित्रपटांनी केला प्रेक्षकांचा मूड ‘ऑफ’

बॉलिवूडमधील अनेक सीक्वल चित्रपटांची नेहमीच क्रेझ असते. जेव्हाही एखादा चित्रपट हिट होतो, तेव्हा प्रेक्षक अनेकदा त्याच्या सीक्वलची आतुरतेने वाट पाहत असतात. असे अनेक चित्रपट आहेत, ज्यांचा सीक्वल चाहत्यांना खूप आवडतो. एवढेच नाही, तर या चित्रपटांचे दोन, तीन आणि चार भागही प्रदर्शित झाले आहेत. यामध्ये ‘धूम’, ‘गोलमाल’, ‘कोई मिल गया’ अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे. मात्र, प्रत्येक सीक्वल चित्रपट प्रेक्षकांना आवडेलच असेही नाही. अनेकदा पहिल्या भागाला प्रेक्षकांकडून खूप प्रतिसाद मिळाला, परंतु पुढील भाग प्रेक्षकांना अजिबात आवडले नाही. चला तर पाहूयात मग हे चित्रपट आहेत तरी कोणते?

सडक २
महेश भट्ट दिग्दर्शित ‘सडक’ चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. संजय दत्त आणि पूजा भट्टच्या केमिस्ट्रीने अनेक चाहत्यांची मने जिंकली. या चित्रपटाला प्रेक्षकांनी अगदी डोक्यावरच घेतले होते. यानंतर महेश भट्ट यांनी ‘सडक २’ सीक्वलची घोषणा केली. त्यावेळी चाहते खूप आतुरतेने चित्रपटाची वाटत पाहत होते. या चित्रपटात संजय दत्त, आलिया भट्ट आणि आदित्य रॉय कपूर यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या, पण हा चित्रपट फ्लाॅप झाला.

स्टुडंट ऑफ द इअर २
‘स्टुडंट ऑफ द इअर’ हा चित्रपट १९ऑक्टोबर, २०१२ साली प्रदर्शित झाला. करण जोहर दिग्दर्शक या चित्रपटात आलिया भट्ट, सिद्धार्थ मल्होत्रा आणि वरुण धवन यांनी काम केले आहे. या चित्रपटातील कथेने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. त्याचवेळी ‘स्टुडंट ऑफ द इअर २’ चित्रपटाची घोषणा करण्यात आली. हा चित्रपट १० मे, २०१९ मध्ये प्रदर्शित झाला, पण हा चित्रपटही फ्लाॅप ठरला. मात्र, या चित्रपटातील टायगर श्राॅफ, तारा सुतारिया आणि अनन्या पांडे खूप चर्चेत आले.

हंगामा २
‘हंगामा’ चित्रपट २००३ साली प्रदर्शित झाला‌ होता. या चित्रपटात अक्षय खन्ना, परेश रावल, आणि रिमी सेन यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. तसेच गणेश जैन दिग्दर्शित ‘हंगामा २’ हा चित्रपट २३ जुलै, २०२१ मध्ये प्रदर्शित झाला. यात अभिनेत्री शिल्पा शेट्टी, प्रणिता सुभाष, मीझान जाफरी आणि परेश रावल दिसले. मात्र, या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे हा चित्रपट फ्लाॅप ठरला.

वेलकम बॅक
अनीस बज्मी यांच्या ‘वेलकम’ या चित्रपटाने चाहत्यांच्या मनावर एक वेगळीच छाप पाडली. या चित्रपटात अक्षय कुमार, कॅटरिना कैफ, परेश रावल आणि अनिल कपूर यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. हा चित्रपट खूप गाजला. त्याचबरोबर ‘वेलकम बॅक’ २०१५ साली प्रदर्शित झाला. पण या चित्रपटामुळे अनेक चाहते नाराज झाले. या चित्रपटात जाॅन अब्राहम, श्रुती हासन यांच्यासह नाना पाटेकर, अनिल कपूर आणि परेश रावल हे त्रिकुट होते, पण या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला नाही.

हाऊसफुल ३
‘हाऊसफुल’ चित्रपटाचे पहिले दोन भाग प्रेक्षकांना खूप आवडले. यातील अक्षय कुमार आणि रितेश देशमुखच्या काॅमेडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. मात्र, ‘हाऊसफुल ३’ मधील त्यांच्या कामगिरीला चाहते अक्षरशः वैतागून गेले होते. त्यामुळे सर्व प्रेक्षक खूप निराश झाले.

या चित्रपटात रितेश देशमुख, अक्षय कुमार, अभिषेक बच्चन आणि बोमन इरानी यांनी काम केले. हा चित्रपट ३ जुलै, २०१६ रोजी प्रदर्शित झाला होता.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-घरच्यांचा विरोध न स्वीकारता केले होते हट्टाने लग्न, ‘असा’ आहे अलका कुबल यांचा जीवनप्रवास

-असा क्रूर खलनायक, ज्याच्या नावात जरी ‘प्रेम’ असले, तरी चित्रपटांमध्ये ‘ते’ कधीही दिसले नाही

-‘बिग बॉस १४’ मधून अचानक प्रकाशझोतात आलेल्या राहुल वैद्याने इंडियन आयडलपासून केली करिअरची सुरुवात

हे देखील वाचा