Friday, March 29, 2024

घरच्यांचा विरोध न स्वीकारता केले होते हट्टाने लग्न, ‘असा’ आहे अलका कुबल यांचा जीवनप्रवास

अभिनय क्षेत्रात आपल्या विनोदी स्वभावाने समोरच्याला हसवणं खूप सोप्पं‌ असतं,परंतु अभिनय करून आपल्या दुःखाची झळ समोरच्यापर्यंत पोहोचवून त्याच्या डोळ्यात पाणी येणे ही तुलनेने खूप अवघड गोष्ट आहे. असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी त्यांच्या निरागस अभिनयाने प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणले आहेत. यातीलच एक सुपरहिट अभिनेत्री, जिने तिच्या अभिनयाने नव्वदच्या दशकात चित्रपटसृष्टीत अक्षरशः आग लावली होती, जिचा निरागस अभिनय पाहून समस्त प्रेक्षक वर्गाला तिचे दुःख आपले वाटले. ही अभिनेत्री म्हणजे अलका कुबल होय.

अलका कुबल यामराठी चित्रपटसृष्टीतील एक ज्येष्ठ आणि प्रतिभावान अभिनेत्री आहेत. ‘माहेरची साडी’ या चित्रपटाचे नाव जरी ऐकले, तरीही सगळ्यांना आठवतं ते अलका कुबल यांचं सालस, सोज्वळ आणि कष्टाळू रूप. या एका चित्रपटाने त्यांना यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले होते. शुक्रवारी (२३ ऑगस्ट) अलका कुबल त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. चला तर जाऊन घेऊया त्यांचा जीवनप्रवास (Marathi actress alka Kubal celebrate her birthday, let’s know about her life)

अलका कुबल यांचा जन्म २३ सप्टेंबर, १९६५ साली मुंबईमधील गोरेगाव येथे झाला. त्यांनी दालमिया कॉलेजमधून त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. शाळेत तसेच कॉलेजमध्ये असल्यापासूनच त्यांना अभिनयात खूप रस होता. इयत्तास तिरीमध्ये असल्यापासून त्या शालेय नाटकात सहभाग घेत असायच्या. तिथूनच त्यांच्यातील ही कला सगळ्यांसमोर आली. त्यांनी इयत्ता दहावीत असताना ‘चकरा’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करताना देखील त्यांना अनेक चित्रपटाच्या ऑफर येऊ लागल्या आणि त्यांनी काम देखील केले होते.

एका चित्रपटाने मात्र त्यांच्या करिअरला एक मोठे वळण दिले. तो चित्रपट म्हणजे ‘माहेरची साडी’ होय. या चित्रपटात अजिंक्य देव, रमेश भाटकर, विक्रम गोखले, किशोरी शहाणे, विजय चव्हाण, उषा नाडकर्णी, जयश्री गडकर यांसारख्या दिग्गज मंडळींसोबत त्यांना काम करण्याची संधी मिळाली. १९९१ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने त्यावेळी तब्बल १२ करोडचा गल्ला जमवला होता. त्याकाळी सहसा एवढा जास्त कमाई होत नसत. कारण चित्रपटाचे तिकीट केवळ १० ते १२ रुपयाच्या भावाने विकले जात होते. तरी देखील या चित्रपटाने सोनेरी अक्षरात त्याचा इतिहास लिहून ठेवला आहे. या चित्रपटाने अलका कुबल यांनी समस्त प्रेक्षक वर्गाला भावुक केले होते. आजही तो चित्रपट पाहिला, तरीही अनेक महिलांचे डोळे पाणावतात.

या एका चित्रपटानंतर अलका कुबल यांना अनेक चित्रपटात काम मिळाले. त्यांनी ‘सोबती’, ‘लेक चालली सासरला’, ‘वहिनीची माया’, ‘तुझ्यावाचून करमेना’, ‘मधुचंद्राची रात्र’, ‘बाळाचे बाप ब्रह्मचारी’, ‘शुभ बोल नाऱ्या’, ‘लपवा छपवी’, ‘येडा की खुळा’, ‘जखमी कुंकू’, ‘शिर्डी साईबाबा’, ‘ओवाळणी’, ‘आई तुझा आशीर्वाद’, ‘अग्नीपरीक्षा’, ‘सुर राहू दे’, ‘ते दोन दिवस’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले आहे. यासोबत त्यांनी ‘नटसम्राट’, ‘संध्याछाया’, ‘मी मालक या देहाचा’, ‘वट सावित्री’ यांसारख्या नाटकात काम करून त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

अलका कुबल यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत बोलायचे झाल्यास त्यांनी दिग्गज सिनेमॅटोग्राफर समीर आठल्ये यांच्यासोबत विवाह केला आहे. खरं तर अलका आणि समीर यांचा प्रेमविवाह झाला आहे. इतरांप्रमाणेच त्यांच्या नात्याची सुरुवात देखील मैत्रीपासून झाली. अनेक चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात कधी झाले, हे त्यांना देखील समजले नाही. मात्र दोघेही त्यांच्या प्रेमाची कबुली देण्यास तयार नव्हते. शेवटी धाडस करून अलका कुबल यांनी समीर आठल्ये यांना लग्नासाठी विचारले. मग त्यांनी देखील मैत्रीच्या पुढे जाऊन एका नव्या नात्याची सुरुवात करण्याचे ठरवले. दोघांनीही त्यांच्या घरात त्यांच्या प्रेमाबाबत सांगितले, पण अलका कुबल यांच्या घरातून त्यांच्या लग्नासाठी विरोध होता. कारण त्यांनी चित्रपटसृष्टीशी संबंधित मुलाशी लग्न करू नये, अशी त्यांची आई-वडिलांची इच्छा होती.

पण म्हणतात ना, ‘प्रेमात आणि युद्धात सगळं काही माफ असतं.’ याचप्रमाणे आई- वडिलांचा विरोध न स्वीकारता त्या देखील हट्टाला पेटल्या आणि “लग्न करेल तर समीरशी नाहीतर आजन्म कुमारी राहील,” असे त्यांनी त्यांच्या आई-वडिलांना सांगितले. शेवटी अलका कुबल यांच्या हट्टापुढे घरच्यांना झुकावे लागले आणि त्यांनी अलका आणि समीर यांचे थाटामाटात लग्न लावून दिले. त्यांना दोन मुली आहेत. एकीचे नाव ईशानी आणि दुसरीचे नाव कस्तुरी आहे. अलका कुबल या लवकरच सासूबाई होणार आहेत. त्यांच्या मोठ्या मुलीचा म्हणजेच ईशानी हिचा काही दिवसांपूर्वी साखरपुडा झाला आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा- ‘झलक दिखला जा’च्या सेटवर शिल्पाने मांडल्या वेदना, माधुरीच्या गळ्यात पडून ढसाढसा रडली अभिनेत्री
सपना चौधरीला बघताच महिलांनी चक्क ट्रकमध्येच धरला ठेका, डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर घालतोय राडा
काय सांगता! अनन्याने एकावेळी केलंय 2 मुलांना डेट? करणने अभिनेत्रीच्या आईसमोरच करून टाकली पोलखोल

 

हे देखील वाचा