Tuesday, July 9, 2024

Lock Upp | फिनालेच्या अगोदर कंगना रणौतच्या शोवर कोर्टाने घातली बंदी, लावला जातोय ‘हा’ आरोप

‘लॉक अप’च्या फिनालेपूर्वी एकता कपूरला (Ekta Kapoor) मोठा धक्का बसला आहे. एकता कपूरच्या ‘लॉक अप’ शोवर हैदराबाद कोर्टाने बंदी घातली आहे. तिच्यावर कॉपीराइट उल्लंघनाचा आरोप लावला जात आहे. कंगना रणौत (Kangana Ranaut) होस्ट करत असलेला ‘लॉक अप’ हा रियॅलिटी शो सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.

याचिकाकर्ते प्राइड मीडियाचे अध्यक्ष, सनोबर बेग यांनी सादर केले की, हैदराबादच्या सिटी सिव्हिल कोर्टाने एकता कपूरचा रियॅलिटी शो ‘लॉक अप’ कोणत्याही प्लॅटफॉर्मवर प्रसारित करण्यास मनाई केली आहे. याबाबत शोला माहिती देण्यात आली आहे, तरीही त्यांनी आपला शो थांबवण्याऐवजी सुरूच ठेवला आहे. (hyderabad city civil court issue stay order on kangana ranaut lock upp)

याचिकाकर्त्याचे वकील जगदीश्वर राव म्हणाले की, “ते न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत नाहीयेत आणि आदेशाचे उल्लंघन करत आहेत.” याचिकाकर्त्याने प्राईड मीडियाच्या सनोबर बेग यांच्या वतीने युक्तिवाद केला की, ‘द जेल’ नावाने ही संकल्पना त्यांचीच आहे. लॉकडाऊनमुळे ‘द जेल’ बनवण्यास उशीर झाला. यामध्ये २२ सेलिब्रिटींना १०० दिवस एकत्र ठेवण्यासाठी एक स्क्रिप्टही तयार करण्यात आली होती, जी चोरीला गेली होती. त्यांनी आपली कल्पना एंडेमोल शाइनच्या अभिषेक रेगेला सांगितली आणि अभिषेकने त्यांची फसवणूक केली.

एकता कपूरच्या शो लॉकअपवर कॉपीराइट उल्लंघनाचा आरोप झाल्यानंतर, हे प्रकरण कोर्टात पोहोचले. याचिकाकर्ते सनोबर बेग यांनी ‘द जेल’ नावाची संकल्पना आपलीच असल्याचे सांगितले होते. यामुळे २३ फेब्रुवारीला हैदराबाद सिटी सिव्हिल कोर्टाने ‘लॉकअप’ला कोणत्याही प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम करण्यास बंदी घातली होती.

या प्रकरणाबाबत, २६ फेब्रुवारी रोजी उच्च न्यायालयाने सांगितले होते की, अल्ट बालाजीने या शोची निर्मिती आधीच केली होती आणि मार्केटिंगवरही खूप पैसा खर्च झाला होता. सोय पाहता ही बाब त्यांच्या बाजूने आहे. १३ एप्रिल रोजी एकता कपूरच्या शोचे प्रसारण थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती, ज्यावर सर्वोच्च न्यायालयाने कारवाई करण्यास नकार दिला आणि खालच्या न्यायालयात जाण्यास सांगितल होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा