×

Dhaakad | कंगना रणौतची शत्रूंवर आगपाखड, चित्रपटाचा दमदार ट्रेलर रिलीझ

बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत (Kangana Ranaut) लवकरच तिच्या ‘धाकड’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीझ करण्यात आला होता, जो चाहत्यांना खूप आवडला होता. चित्रपटाच्या नावाप्रमाणेच कंगनाही टीझरमध्ये अशाच स्टाईलमध्ये दिसली होती आणि अशातच आता ‘धाकड’चा ट्रेलरही रिलीझ झाला आहे. ज्यामध्ये कंगना जबरदस्त ऍक्शन करताना दिसत आहे.

रजनीश राजी घई दिग्दर्शित या चित्रपटात कंगना अग्नि नावाच्या गुप्तहेराची भूमिका साकारत आहे. ट्रेलरमध्ये कंगनाचे वेगवेगळे रूप पाहायला मिळाले असून, ती धमाकेदार ऍक्शन करताना दिसत आहे. (dhaakad trailer out kangana ranaut goes atomic in her first spy action thriller)

ट्रेलरमध्ये कंगना जबरदस्त अ‍ॅक्शन करताना दिसत आहे, तर खनन माफियाच्या भूमिकेत अर्जुन रामपालही (Arjun Rampal) तिला टक्कर देताना दिसत आहे. ट्रेलरमध्ये अभिनेत्री दिव्या दत्ताचीही (Divya Dutta) जबरदस्त झलक दिसली. यात ती एका वेश्येच्या भूमिकेत दिसत आहे. तसेच, ट्रेलरमध्ये कंगना शत्रूसोबत लढताना दिसत आहे.

चित्रपटात सात वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार कंगना
कंगना ही अग्नी नावाच्या गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे, जी वेश बदलण्यात माहिर आहे. रिपोर्टनुसार, कंगना ‘धाकड’ चित्रपटात सात वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे, ज्याची झलक ट्रेलरमध्येही पाहायला मिळत आहे. ‘धाकड’ या चित्रपटाचे दिग्दर्शन राजी घई यांनी केले आहे, तर सोहोल मकलाई यांनी याची निर्मिती केली आहे.

‘या’ दिवशी रिलीझ होणार धाकड
प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून ‘धाकड’च्या रिलीझची वाट आहेत. याआधी हा चित्रपट ८ एप्रिलला प्रदर्शित होणार होता, मात्र त्याची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्यात आली. कंगनाचा हा चित्रपट आता २० मे २०२२ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post