Tuesday, July 9, 2024

सैफचा मुलगा करतोय अर्जुन रामपालच्या लेकीला डेट? व्हायरल फोटोवरून सोशल मीडियावर रंगली एकच चर्चा

अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अमृता सिंगचा (Amruta Singh) मुलगा इब्राहिम अली खान (ibrahim Ali Khan) सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत येत असतो. सोशल मीडियावर त्याचे फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग प्रमाणेच इब्राहिमही एक रॉयल लाईफ जगत असतो. आपल्या आई वडिलांप्रमाणे लवकरच तो चित्रपट जगतात पदार्पण करणार आहे. त्याआधी इब्राहिम खान करण जोहरच्या चित्रपटाला असिस्ट करणार आहे. त्याआधी तो एका व्हायरल फोटोमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. ज्यामध्ये तो अभिनेता अर्जुन रामपालची मुलगी माहिका रामपालसोबत पार्टी करताना दिसत आहे. सध्या या फोटोची चर्चा रंगली आहे.

सिने जगतातील कलाकार जितके चर्चेत येत असतात. तितकीच त्यांच्या मुलांचीही सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत असते. अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानचीही अशीच चर्चा काही दिवसांपूर्वी  रंगली होती. यावेळी तो अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीसोबत गाडीमध्ये फिरताना दिसला होता. कॅमेरे पाहून पलकने तोंड लपवल्याने दोघांमध्ये प्रेम प्रकरण सुरू असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली होती. परंतु त्यानंतर लगेचच पलक तिवारीने याबद्दल खुलासा करताना असे काही नसल्याचे सांगत या चर्चांना पुर्णविराम दिला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा अभिनेता इब्राहिम अली खान अर्जुन रामपालच्या मुलीसोबत दिसल्याने जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

 

 

इब्राहिमचे हे फोटो लंडनमधील एका क्लबमधील आहेत ज्या ठिकाणी तो मित्रांसोबत पार्टी करताना दिसत आहे. या व्हायरल फोटोंमध्ये इब्राहिमने काळ्या रंगाचा शर्ट घातला आहे. त्याच्यासोबत त्याचा मित्र ओरहान अवत्रमणि आणि अभिनेता अर्जुन रामपालची मुलगी माहिका दिसत आहे. यावेळी माहिकाने काळा टॉप आणि टाऊजर घातला आहे. इब्राहिमच्या मित्राने हे फोटो त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केले आहेत. दरम्यान सैफ अली खानचा मुलगा इब्राहिमचे फोटोशूट अनेकवेळा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याचबरोबर तो निर्माता करण जोहरच्या रॉकी और रानी की प्रेम कहाणी या चित्रपटासाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम करताना दिसणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

हेही वाचा –

‘बजरंगी भाईजान’च्या सिक्वेलमध्ये होणार ‘हे’ मोठे बदल, लेखकाने कथेशी संबंधित केला मोठ्ठा खुलासा

‘प्रेक्षकांना काय पाहिजे हे मला चांगल कळत’, अभिनेत्री कंगना रणौतने ‘इमर्जन्सी’ चित्रपटाबद्दल केला मोठा खुलासा

‘खतरों के खिलाडी’चे निरनिराळे स्टंट… अभिनवच्या आठवणीत ‘या’ प्राण्याला किस करायला लागली रुबिना दिलैक

 

 

 

हे देखील वाचा