×

पलक तिवारीच्या ‘या’ वागण्याने दुखावला इब्राहिम अली खान; दोघांमध्ये निर्माण झालाय दुरावा

बॉलिवूड अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) आणि तिची मुलगी पलक तिवारी (Palak Tiwari) सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरले आहेत. आपल्या आक्षेपार्ह विधानामुळे श्वेता तिवारीवर सर्वत्र टीकेचा भडिमार होत असतानाच, आता पलक तिवारी आणि इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) चर्चेत आले आहेत. मात्र ही चर्चा त्यांच्या नात्यातील जवळीकतेची नसून, पलकच्या वागण्यामुळे त्यांच्यामध्ये आलेल्या दुराव्याची आहे. काय आहे हा संपूर्ण प्रकार चला जाणून घेऊया…

अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी आणि सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम खानची सध्या सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. काही दिवसांपुर्वी दोघेही गाडीतुन एकत्र फिरताना दिसून आले होते, ज्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले होते. दोघांच्यात नक्की काय सुरू आहे, अशीच चर्चा सर्वत्र पाहायला मिळत होती. यावेळी कॅमेऱ्याची नजर पडूनही इब्राहिम खान त्यांना हसत हसत सामोरा गेला. या उलट पलक तिवारी मात्र तोंड लपवताना दिसून आली.

पलकची ही कृती इब्राहिमला बालिशपणाची वाटली. याच गोष्टीचा इब्राहिमला राग आल्याने दोघांच्यात सध्या दुरावा निर्माण झाल्याची बातमी समोर आली आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आणि माध्यमांमध्ये पलकच्या या कृतीची चर्चा सुरू झाल्यानंतर, दोघांंनी एकमेकांपासून लांब राहणे पसंत केल्याचीही चर्चा सध्या सुरू आहे.

पलक तिवारी हार्डी संधुच्या ‘बिजली बिजली’ गाण्यामधल्या धमाकेदार डान्समुळे सगळीकडे लोकप्रिय ठरली होती. ती लवकरच ‘रोजी’ नावाच्या चित्रपटातुन आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणार आहे. हा एक भयपट असुन गुरुग्राममध्ये एका बीबीओ कंपनीत काम करणारी महिला कर्मचारी रोजी अचानक गायब होते, याच सत्य घटनेवर हा चित्रपट आधारित आहे.

त्याचबरोबर इब्राहिम खानही करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपटात झळकणार आहे. ज्याच्या प्रदर्शनाची तारीख लवकरच समोर येणार आहे. मात्र पलक तिवारीसोबतच्या चर्चांमुळे तो सध्या सगळीकडे चर्चेचा विषय ठरला आहे.

दुसरीकडे, अभिनेत्री श्वेता तिवारीने आपल्या अंतवस्त्राबद्दल वादग्रस्त विधान केले होते, ज्यामुळे तिच्यावर सगळीकडून जोरदार टीका झाली होती.

हेही वाचा :

Latest Post