Saturday, July 6, 2024

आर्यनच्या अडचणीत वाढ; जामीन फेटाळल्यानंतर एनसीबी अधिकारी म्हणाले, ‘या निर्णयाने आरोप करणाऱ्यांची बोलती बंद’

अं’मली पदार्थविरोधी प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यन खानच्या अडचणी अजून वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शुक्रवारी (8 ऑक्टोबर) झालेल्या सुनावणीदरम्यान आर्यन खानचा जामीन अर्ज न्यायालयाकडून फेटाळण्यात आला. कारवाईत आर्यनकडून कोणत्याही प्रकारचे अं’मली पदार्थ एनसीबीच्या अधिकार्‍यांना मिळाले नव्हते. त्यामुळे आर्यन खानला जामीन मिळेल असा प्रत्येकाचा दावा होता. परंतु न्यायालयात चार तास चाललेल्या युक्तिवादात शेवटी आर्यन खानचा जामीन अर्ज फेटाळला गेला. ज्यामुळे सिने जगतात नाराजीचा सूर उमटला आहे.

एनसीबीकडून न्यायालयात हजर असलेले अधिकारी जनरल अनिल सिंग यांनी दावा केला होता की, ज्या न्यायालयात आर्यन खानची सुनावणी सुरू आहे, ते न्यायालयात जामीन मंजूर करू शकत नाही. अनिल यांच्या दाव्याला सहमती दर्शवत न्यायालयाने एनसीबीला या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करायची आहे, अस सांगत आर्यन खानसह अटकेत असलेल्या बाकी आठ जणांचाही जामीन अर्ज फेटाळला आहे.

याबाबत एका एनसीबीच्या अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, “हा आमच्यासाठी मोठा विजय आहे. आम्ही निरपराध लोकांना अटक केले आहे, असा आरोप आमच्यावर होत होता. अशावेळी न्यायालयाच्या या निर्णयाने आमच्यावर आरोप करणाऱ्यांची बोलती बंद केली आहे.” न्यायालयाला या संपूर्ण प्रकरणात सत्यता दिसून येत असल्याने, न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

याबद्दल अधिक माहिती देताना एनसीबीच्या अधिकार्‍यांनी सांगितल की, जेव्हा अतिरिक्त मेट्रोपोलियन न्यायालय आरोपींचा जामीन अर्ज फेटाळते, तेव्हा त्या केसमध्ये सत्यता असल्याचं निदर्शनास येते. न्यायालयाच्या या निर्णयाने एनसीबीच्या कारवाईवर टीका करणार्‍यांचे तोंड बंद झाल्याचा दावा सुद्धा त्यांनी केला. दरम्यान एनसीबीवर राजकीय व्यक्तींचा दबाव असल्याचा आरोप करणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

अमिताभ यांच्यासोबत असणाऱ्या अफेयरच्या प्रश्नावर उत्तर देताना रेखा म्हणाल्या होत्या…

आसामच्या फ्लोरिना गोगोईने पटकावले ‘सुपर डान्सर चॅप्टर ४’चे विजेतेपद

यूरोपच्या जंगलांमध्ये बंडखोरीच्या प्रयत्नात दिसला अभिनेता विकी कौशल, फोटो व्हायरल

हे देखील वाचा