Thursday, April 25, 2024

अनुराग कश्यप यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेले ‘हे’ ५ जबरदस्त चित्रपट नाही पाहिले, मग काय पाहिलं तुम्ही?

बॉलिवूड चित्रपटांचे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक अनुराग कश्यप त्यांच्या जबरदस्त चित्रपटांच्या कंटेंटसाठी खूप प्रसिद्ध आहेत. अनुराग कश्यप यांचे चित्रपट प्रेक्षक मोठ्या आवडीने पाहतात. त्याचबरोबर आजच्या युगात ते असे दिग्दर्शक आहेत, ज्यांचे नाव ऐकताच प्रेक्षक चित्रपट पाहण्यास उत्सुक होतात. त्याचबरोबर याच प्रेक्षकांचे लाडके अनुराग कश्यप हे शुक्रवारी (१० सप्टेंबर) आपला ४९ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज या लेखात त्यांच्या ५ सर्वोत्कृष्ट चित्रपटांबद्दल जाणुन घेऊयात.

ब्लॅक फ्रायडे (२००४)
अनुराग कश्यप यांचा पहिला चित्रपट ‘ब्लॅक फ्रायडे’ हा होता. जो त्यांच्या दिग्दर्शनाखाली बनवण्यात आला आणि नंतर प्रदर्शित झाला. ब्लॅक फ्रायडे हा १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटांवर आधारित होता. हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता. या चित्रपटात अनुराग कश्यप यांनी मुंबईचे अतिशय बदललेले युग दाखवले. या चित्रपटात आपल्याला केके मेनन, पवन मल्होत्रा, आदित्य श्रीवास्तव असे अनेक कलाकार मुख्य भूमिकेत पाहायला मिळाले. (Here are 5 great films made under the direction of director Anurag Kashyap)

रिटर्न ऑफ हनुमान (२००७)
फार कमी लोकांना माहित आहे की, अनुराग कश्यप यांनी लहान मुलांसाठीही चित्रपट बनवले आहेत. ‘रिटर्न ऑफ हनुमान’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुराग यांनी केले होते. हा चित्रपट २००७ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्या काळात मुलांमध्ये या चित्रपटाबाबत एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळाली. हा चित्रपट अनेक शाळांमध्येही दाखवण्यात आला.

देव डी (२००९)
एक ‘देवदास’ हा चित्रपट शाहरुख खानचा होता. दुसरा एक चित्रपट अनुराग कश्यप यांनी तयार केला होता, ज्याला ‘देव डी’ असे नाव देण्यात आले होते. हा चित्रपट एक ब्लॅक कॉमेडी रोमान्स ड्रामा चित्रपट आहे. जो शाहरुख खानच्या क्लासिक देवदासची आधुनिक आवृत्ती मानला जातो. या चित्रपटात, अभिनेता अभय देओल देखील आहे.

गुलाल (२००९)
अनुराग कश्यप यांना लहानपणापासूनच राजकीय ड्रामा चित्रपट करायला आवडायचे. ज्यामुळे त्यांनी ‘गुलाल’ची कथा बनवण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटात महाविद्यालयीन राजकारण अतिशय चांगल्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे. हा चित्रपट राजस्थानच्या भूमीवर आधारित आहे. या चित्रपटात मेनन, राजसिंग चौधरी, अभिमन्यू सिंग, दीपक डोबरियाल, पियुष मिश्रा हे कलाकार दिसून येतात.

गॅंग्स ऑफ वासेपूर १,२ (२०१२)
अनुराग कश्यप यांनी त्यांच्या आयुष्यात एक मास्टर पीस बनवला आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी या चित्रपटाचे २ भाग देखील बनवले आहेत.

एका कुटुंबाचे परस्पर वैर या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. तर या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी, मनोज बाजपेयी, ऋचा चड्ढा, हुमा कुरेशी असे अनेक कलाकार आहेत.

हे देखील वाचा