हिंदी मालिका क्षेत्रात असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी आधी चित्रपटात नशीब आजमावले होते मात्र त्यांना या क्षेत्रात अपेक्षित यश मिळू शकले नाही त्यामुळे त्यांनी छोट्या पडद्यावर काम करण्यास सुरुवात केली. यामध्ये लोकप्रिय टीव्ही अभिनेता इकबाल खानचे नाव घेतले जाते. आज (10 फेब्रुवारी) इकबाल खान आपला 41 वा वाढदिवस साजरा करत आहे जाणून घेऊया त्याच्याबद्दल.
इकबाल खान हा लोकप्रिय टीव्ही कलाकारांपैकी एक आहे. मूळ काश्मीरचा रहिवासी असलेल्या इकबालने आपल्या कारकिर्दीला मॉडेलिंगपासून सुरुवात केली होती. सध्या टीव्ही मालिकांमध्ये प्रसिद्ध असलेला इकबाल सुरुवातीला हिंदी चित्रपटात झळकला होता. काश्मीरमध्ये आपले शिकण पूर्ण केल्यानंतर तो काम करण्यासाठी मुंबईला आला होता. इकबालने 2002 मध्ये आलेल्या ‘कुछ दिल ने कहा’ चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर लगेच 2003 मध्ये तो ‘फंटूश’ चित्रपटातही झळकला होता. 2005 मध्ये ‘बुलेट एक धमाका’ चित्रपटातील त्याच्या भूमिकेचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते. यानंतर दीर्घकाळ तो चित्रपटात दिसला नाही. 2014 मध्ये त्याने ‘अनफॉरगेटेबल’ आणि ‘इंदू की जवानी’ चित्रपटात भूमिका साकारली होती. त्यानंतर इकबालने चित्रपट क्षेत्रापासून दूर जाण्याचा निर्णय सोडला.
चित्रपट क्षेत्रातून बाहेर पडल्यानंतर त्याने मालिका क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 2005-06 मध्ये ‘कैसा ये प्यार है’ मालिकेतून छोट्या पडद्यावर दमदार प्रवेश केला. या मालिकेतील अंगदच्या भूमिकेने त्याला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली. यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. छोट्या पडद्यावर भरभरुन प्रसिद्धी मिळत असतानाही इकबालने धक्कादायक निर्णय घेत या क्षेत्रापासून काही काळ दूर गेला. तीन वर्ष तो छोट्या पडण्यापासून लांब राहिला या काळात त्याने वेबसिरीजमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. 2021 मध्ये ‘क्रॅकडाऊन’मध्ये झळकला होता. आपल्या अभिनयासाठी प्रसिद्ध असणार्या इकबालने सोशल मीडिया पासूनसुद्धा लांब जाण्याचा निर्णय घेतला. “मी नाश्त्याला काय खातो, कुठे फिरतो?” यापेक्षा माझ्या कामाने मी प्रेक्षकांना आकर्षित करत असतो असे त्याने याबद्दल बोलताना म्हटले होते.
हेही वाचा :