Friday, July 25, 2025
Home बॉलीवूड अरर, हे काय झालं! जेवण बनवायला गेली आणि बोटंच घेतली कापून, लहान मुलांप्रमाणे रडत होती इलियाना

अरर, हे काय झालं! जेवण बनवायला गेली आणि बोटंच घेतली कापून, लहान मुलांप्रमाणे रडत होती इलियाना

टॉलिवूड आणि बॉलिवूड अभिनेत्री जिने तिच्या अभिनयाने सगळ्यांना वेड लावले आहे. ती म्हणजे इलियाना डिक्रूज होय. तिचा अभिनय सगळ्यांना खूप आवडतो. अशातच ती तिच्या चित्रपटामुळे नाही, तर तिच्या कुकिंगमुळे चर्चेत आहे. इलियानासोबत किचनमध्ये अशी एक घटना घडली आहे की, ज्यामुळे ती लहान मुलांप्रमाणे रडताना दिसत आहे. ही माहिती तिने स्वतः इंस्टाग्राम अकाऊंटवरून दिली आहे.

इलियाना किचनमध्ये जेवण बनवताना चुकून तिची दोन बोटं कापते. याबाबत तिने तिच्या चाहत्यांसोबत पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहिले आहे की, “मी जेवण बनवताना माझी दोन बोटं कापली आहेत. बॅंडेज लावताना मी अगदी लहान मुलांप्रमाणे रडत होते.” यानंतर तिने फॉलोअप पोस्ट शेअर केली आहे. तिने लिहिले आहे की, “असे पहिल्या वेळेस झाले नाही. या आधी देखील अनेकवेळा तिची बोटं कापली आहेत.” यानंतर तिने सांगितले की, तिची बोटं आता ठीक आहेत. यासोबत तिने सांगितले की, “रडण्यात कसली लाज.” (Ileana D’Cruz injured her hand during cooking shared post on Instagram)

Photo Courtesy Instagramileana official

या आधी देखील इलियानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यामध्ये ती विमानतळावर फोटोग्राफरसोबत बोलताना दिसत होती. यावेळी ती त्याला मास्क नीट लावण्याचा सल्ला देत होती. तिच्या या व्हिडिओला देखील तिच्या चाहत्यांनी खूप प्रेम दर्शवले होते. अनेकजण तिचे कौतुक करत होते.

इलियानाने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतही अनेक चित्रपटात काम केले आहे. तिने २०१२ साली ‘बर्फी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. तिने ‘फटा पोस्टर निकला हीरो’, ‘मैं तेरा हिरो’, ‘रुस्तम’ यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने अभिषेक बच्चन सोबत ‘द बिग बुल’ या चित्रपटात काम केले आहे. अनिस बज्मी यांच्या ‘पागलपंथी’ या चित्रपटातही ती झळकली आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अनिल कपूर, जॉन अब्राहम, अर्शद वारसी, पुलकित सम्राट, उर्वशी रौतेला आणि सौरभ शुक्ला यांनी काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-सगळं चांगलं सुरू असतानाच ‘त्या’ कारणामुळे अर्चनाने मारली कृष्णाला लाथ; व्हिडिओ जोरदार व्हायरल

-‘केबीसी १३’मध्ये स्पर्धकाने केले ‘असे’ काही; अमिताभ बच्चन म्हणाले, ‘स्वप्नातही विचार केला नव्हता…’

-रिलीझ होताच चाहत्यांच्या ओठांवर रुळतंय प्रमोद प्रेमीचे ‘हे’ गाणे, पाहायला मिळाला महापर्वचा महिमा

हे देखील वाचा