नव्या वर्षाच्या स्वागतासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी हे नेहमी कुठे ना कुठे जात असतात. बऱ्याचदा हे बॉलिवूड सेलिब्रिटी आपल्याला मालदीवमध्येच ३१ डिसेंबरची पार्टी एन्जॉय करताना दिसतात. काही दिवसांपूर्वी अभिनेते चंकी पांडे यांची कन्या अनन्या पांडे आणि तिचा तथाकथित प्रियकर अभिनेता ईशान खट्टर हे मालदीवमध्ये सुट्ट्या एन्जॉय करताना दिसले होते. त्याच प्रमाणे आणखीन एक जोडी आपल्या सुट्ट्या एन्जॉय करतेय ती म्हणजे अभिनेत्री कियारा अडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा!
या दोघांचंही काहीतरी सुरू असल्याच्या चर्चा बी-टाऊनमध्ये सध्या सुरू आहेत. त्यात हे दोघेही एकत्र मालदिवला फिरायला गेलेत… चर्चा तर होणारच ना मंडळी! चला तर मग पाहुयात दोघेही कशाप्रकारे नवीन वर्षाची सुरुवात एन्जॉय करत आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी सध्या तिचा तथाकथित प्रियकर सिद्धार्थ मल्होत्रासोबत मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. मालदीवमध्येच कियारा आणि सिद्धार्थ नवीन वर्ष साजरं करतायत. यादरम्यान कियाराने तिचे काही हॉट फोटोही इन्स्टाग्रामवर शेअर केले होते, जे जोरदार व्हायरल होत आहेत. कियारा आणि सिद्धार्थ कोणत्याही फोटोंमध्ये एकत्र दिसत नसले तरी दोघेही सतत सोशल मीडिया अकाउंट्सवर मालदीवचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत आहेत.
अलीकडेच कियाराने तिच्या इंस्टा स्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ती बीचवर पडलेली दिसत आहे. या फोटोमध्ये कियाराने राखाडी रंगाची बिकिनी परिधान केली आहे, ज्यासह तिने पिवळा शर्ट परिधान केले आहे. या फोटोमध्ये कियाराने तिच्या डोळ्यांवर हात ठेवले आहेत आणि ती फोटो क्लिक करणाऱ्या विशिष्ट व्यक्तीकडे पाहत आहे असं दिसतंय.
याशिवाय कियाराने इंस्टा स्टोरीवरील बुमरॅंग व्हिडिओसुद्धा शेअर केला आहे ज्यामध्ये ती पिंक आणि व्हाइट बिकिनीमध्ये दिसली आहे. यापूर्वी अभिनेत्रीने तिचा फोटो लाल रंगात बिकिनी आणि गोल्डन बॅकलेस ड्रेसमध्ये शेअर केला होता, तो हॉट दिसत होता.
कियारा व्यतिरिक्त सिद्धार्थ मल्होत्राने आपल्या इंस्टाग्रामवर मालदीवच्या सुट्टीचे काही व्हिडिओही शेअर केले आहेत ज्यात तो आपल्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देताना दिसत आहे.
कियारा नुकतीच ‘इंदू की जवानी’ चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट ११ डिसेंबरला मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. ‘इंदू की जवानी’ करोना काळानंतर प्रथमच चित्रपटगृह उघडल्यानंतर प्रदर्शित होणारा पहिलाच चित्रपट ठरला. आता कियारा वरूण धवनसोबत ‘जुग जुओ जिओ’, ‘भूल भूलैया २’ आणि ‘शेरशाह’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे. अभिनेता सिद्धार्थ शेरशाहमध्ये कियाराबरोबर स्क्रीनदेखील शेअर करणार आहे. पहिल्यांदाच हे दोघे एखाद्या चित्रपटात एकत्र काम करताना दिसणार आहेत.