Friday, April 25, 2025
Home कॅलेंडर चाळीशीपार शिल्पा शेट्टीचा बोल्ड अंदाज पाहून सगळेच अवाक्, बिकिनीतील फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ

चाळीशीपार शिल्पा शेट्टीचा बोल्ड अंदाज पाहून सगळेच अवाक्, बिकिनीतील फोटोंचा सोशल मीडियावर धुमाकूळ

शिल्पा शेट्टी कुंद्रा तिच्या डान्स साठी आणि फिटनेससाठी खूप लोकप्रिय आहे. शिल्पाने तिच्या फिटनेसच्या बाबतीत अनेक मोठ्या अभिनेत्रींना मात दिली आहे. शिल्पाने नुकताच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ब्लैक प्रिंटेड मोनोकिनी घातलेला फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंवर तिच्या फॅन्ससोबतच अनेक कलाकारांनी देखील कमेंट केल्या आहेत.

शिल्पा शेट्टी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोव्यामध्ये आहे. तिथे ती तिच्या संपूर्ण कुटुंबासोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. या ट्रिपचे अनेक फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले. नुकतेच तिने तिचा ब्लैक प्रिंटेड मोनोकिनी घातलेले दोन फोटो पोस्ट केला या फोटोवर खूप कमेंट्स आल्या.

एका फोटोला पोस्ट करताना तिने लिहले, “मी आज जुन्या चालत आलेल्या रूढी, परंपरा तोडण्याच्या मूड मध्ये आहे. म्हणूनच आज बुधवारी सुद्धा मी आठवड्यचा शेवटचा दिवस असल्यासारखा आनंद घेत आहे. “ह्या फोटोवर तिला कलाकार, फॅन्स इतर लोकं कॉम्प्लिमेंट देत आहे. यात जॅकलिन फर्नाडिसने शिल्पाच्या फोटोवर केलेली कमेंट लक्ष वेधून घेत आहे. जॅकलिन कमेंट केली की, “ओह माय गॉड तू तर देवी आहेस.” तर शिल्पा शेट्टी कुंद्राच्या पतीने लिहले की, “ती फक्त माझी आहे.” शिल्पाने दुसरा फोटो पोस्ट करत लिहले की, “उन्हात बसली आहे, गार वाऱ्याचा आनंद घेत आहे, हे ते क्षण आहे ज्यांना मी थांबवू इच्छिते.”

४५ वर्षीय शिल्पा सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह आहे. ती नेहमी तिचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. शिल्पा बहुतेक करून योगा, रेसिपी शेयर करत असते. शिल्पा तिच्या फिटनेसच्या बाबतीत कोणतीही तडजोड करत नाही. तिचा फिटनेस अनेक लोकांसाठी कायम प्रेरणा देणारा असतो. शिल्पा बऱ्याच काळापासून चित्रपटांपासून दूर आहे. मात्र लवकरच ती निकम्मा आणि हंगामा २ या दोन चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

निकम्मा चित्रपटाचे दिग्दर्शन साबीर खान करत असून या सिनेमातून अभिनेत्री भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यु दसानी आणि यू-ट्यूबर शर्ली सेठीया मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यासिनेमाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. लवकरच हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. तर हंगामा २ चे दिग्दर्शन प्रियदर्शन करत असून, हा सिनेमा जुन्या हंगामा चित्रपटाचा सीक्वल आहे. हंगामा २ मध्ये शिल्पा सोबत परेश रावल, मीज़ान जाफरी आणि प्रणीता सुभाष दिसणार आहेत.

हे देखील वाचा